जळगाव: डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालय येथे भारत महासत्ता निर्मितीत आपला सहभाग युवक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी खासदार पूनम ताई महाजन या उपस्थित होत्या तर मंचावर गोदावरी फाउंडेशनचे सर्वेसर्वा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी ताई पाटील उपस्थित होते.
यावेळी पुनम ताई महाजन यांनी मार्गदर्शन करताना. 2047 ला भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी आहे. 1947 ला स्वातंत्र्यासाठी अनेकांनी फटके खाल्ले आणि अनेक जण हुतात्माही झाले. भारताच्या स्वातंत्र्याच्या शतकाला 23 वर्ष बाकी आहेत. भारताला जागतिक महासत्ता झालेले बघायचे असेल तर तरुणांनी आपली स्वप्ने भारताशी जोडले पाहिजे. भारत महासत्ता झाल्यानंतर संधी उपलब्ध होणारच आहे. भारत स्वतंत्र होण्यासाठी जे झटले त्याचे फळ 2047 च्या रूपात आपल्याला बघायला मिळणार आहे. 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताना हे सरकार युवक आणि महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते. तुम्ही ध्येय ठरवले तर मार्ग नक्कीच दिसतात.युवकांच्या स्वप्नांना योग्य प्रारंभ देण्यासाठी भारत सरकार नेहमी तयार आहे. काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजे. कोविड मध्ये भारत निर्मित लस जगात सर्वोत्तम ठरल्या. आपण सर्व मिळून भारताला पुढे नेऊ असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पूनम ताई महाजन यांनी दिली. समारोपीय भाषण माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले तर प्रस्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत साळुंके यांनी केले.