डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात खात्रीशीर उपचार
जळगाव – बर्याचदा आपण जास्त मीठ खाल्ल्याने होणार्या आजारांबद्दलचर्चा करतो, मात्र शरीरात मीठ किंवा सोडियम कमी होण हे देखील धोक्याचे आहे. शरीरात सोडियम कमी झाल्यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. जेव्हा शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण खूप जास्त किंवा खूप कमी होते, तेव्हा रक्तातील सोडियमचे प्रमाण खूप कमी होते. त्याचा मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. रक्तातील सोडियम शरीरात विद्युत संचलन करण्यास मदत करते, ज्यामुळे आपण कोणतेही काम योग्य प्रकारे करू शकतो. सोडियम हे इलेक्ट्रोलाइट आहे जे शरीराच्या प्रत्येक पेशीमधील पाण्याचे नियमन करते.
सोडियमच्या कमतरतेला वैद्यकीय भाषेत हायपोनेट्रेमिया असेही म्हणतात. सोडियम नियमित रक्तदाब राखण्यास मदत करते. हे शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करते तसेच स्नायू आणि नसा सक्रिय करण्यास मदत करते. प्रौढ व्यक्तीमध्ये सोडियमची पातळी 135 ते 145 दरम्यान असावी. जेव्हा रक्तामध्ये सोडियमची कमतरता असते तेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू लागते आणि त्यामुळे शरीरावर सूज येते. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. इतकेच काय तर जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. सोडियमच्या तीव्र कमतरतेमुळे, एखादी व्यक्ती कोमामध्ये देखील जाऊ शकते. याचा मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो कारण मेंदूला सूज आल्याने स्मरणशक्ती कमी होते तसेच इतर मानसिक आजार देखील जडण्याची शक्यता निर्माण होते.
अशी आहेत लक्षणे
शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे मेंदू कमजोर होऊ लागतो. डोकेदुखीची समस्या सतत भेडसावते. मनात अनेकदा गोंधळ असतो. याशिवाय शरीरात थकवा येतो. सोडियमच्या कमतरतेमुळे व्यक्तीला थकवा आणि सुस्तपणा जाणवू लागतो. चिडचिड आणि विस्मरण सारख्या समस्या देखील निर्माण होतात. रक्तातील सोडियमच्या कमतरतेमुळे, अस्वस्थता जाणवते. सोडियम स्नायूंना सक्रिय करते परंतु त्याच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात. स्नायू दुखू लागतात. सोडियमच्या कमतरतेमुळे पोटाचा त्रास होतो. त्यामुळे मळमळ, उलट्या आणि पोटदुखीची तक्रार जाणवते. गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्ण बेशुद्ध देखील होऊ शकतो.
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांचा घ्या सल्ला
शरीरातील सोडिअमचे प्रमाण कमी झाल्यास त्वरीत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील तज्ञांचा सल्ला घ्या. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अशा रूग्णांसाठी औषधोपचारासह आवश्यक त्या सुविधांच्या माध्यमातून खात्रीशीर उपचार केला जातो. तरी गरजू रूग्णांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.