अ) गुडघ्याची संरचना : गुडघ्याच्या सांध्याची रचना ही मुख्यत्वे तीन हाडापासुन बनलेली असते. 1) फिमर : मांडीचे हाड 2) टिबीया : पायाचे हाड 3) पटेला : गुडघ्यावरील वाटी या सर्व हाडांवर कार्टिलेजचे आवरण असते. हे आवरण पांढरे शुभ्र, मऊ व निसरडे असते. या कार्टिलेजवर एक द्रव असतो. त्यास सायनोव्हिअल फ्ल्युएड म्हणतात. हा द्रवपदार्थ कार्टिलेजचे पोषण व त्याचा गुळगुळीतपणा कायम ठेवण्यासाठी मदत करतो. या तीन्ही हाडांची हालचाल सुसंगत ठेवण्यासाठी सांध्यातील अंतर्गत अस्थिबंध (लिगामेंटस मदत करतात) गुडघ्याच्या आत दोन अस्थीबंध (एसीएल) व (पीसीएल) व बाहेर दोन अस्थिबंध असतात. याशिवाय सांध्यांमध्ये दोन गाद्या (मिनीस्कस) असतात, ज्या शॉक अब्जीर्बर म्हणुन काम करतात.
ब) संधिवात : वाढत्या वयोमानानुसार सांध्यांच्या वापरामुळे व सांध्यातील द्रावाचे प्रमाण व त्याची गुणवत्ता कमी झाल्याने सांध्यावरील पुर्ण ताण हा सांध्यातील अस्थिबंध मिनीस्कस व कार्टिलेजवर पडतो. हा जोर सतत चालु राहील्याने वरील सर्व घटकांवर त्याचा दुष्परीणाम पडण्यास सुरवात होते. परीणामी त्यांचे घर्षण वाढुन गुडघ्यांची झिज होते. यालाच गुडघ्यांचा संधिवात म्हणतात.
क) आजाराची लक्षणे : सांध्यात तीन आठवड्यापेक्षा जास्त वेदना असणे, तीन आठवड्यापेक्षा जास्त गुडघ्यावर सुज असणे, दिवसेंदिवस सांध्यांची हालचाल कमी होणे, मांडी व पायाच्या स्नायुंमध्ये अशक्तपणा व कमजोरी निर्माण होणे, सांध्यांमध्ये व्यंग निर्माण होणे अशी आजाराची लक्षणे आहेत.
गुडघ्याच्या संधिवाताची प्रमुख कारणे : वाढते वय (40 पेक्षा जास्त), लठ्ठपणा (बॉडी मास इंडेक्स 25 व अधिक), स्नायुबंधाची इजा/ गादी फाटणे, खेळाडु, सांध्यांच्या इतर आजारांमुळे प्रभावित होऊन संधीवात निर्माण होणे. जसे :रूमॅटॉईड आर्थायढीस सिरोनिगेेटिव्ह आर्थोपॅथी, लुज बॉडीज, हाडाचे जुने फ्रॅक्चर, सिकलसेल, हिमोफेलीया, जुना मार, कॅल्शीयम, व्हीटॅमीन डीची कमतरता, मुडदुस सारखे आजार, गुडघ्याचा जंतुसंसर्ग इन्फेक्शन, स्टिरॉईडचा अयोग्य वापर.
चाचण्या /तपासण्या : क्ष-किरण (एक्स-रे)तपासणी उभे राहुन दोन्ही गुडघ्यांचा एक्स-रे केल्यानंतर त्यात खालील बदल दिसल्यास संधिवाताचे निदान होते. सांध्यातील दोन हाडातील अंतर कमी होते/दिसते, सांध्यांच्या हाडातील किनार्यावर अॅस्टीओफाईट्स दिसुन येतात, हाडाची घनता कमी दिसुन येते, सांध्यांमध्ये व्यंग दिसुन येते.
ड)उपचार :-
अ) संधिवात कसा टाळावा : वजन कमी करावे, पायर्यांची चढ-उतार टाळावी, जमिनीवर मांडी घालुन बसणे टाळावे, शक्यतोवर खुर्चीचा वापर करावा, पाश्चात्य पध्दतीच्या शौचालयाचा वापर करावा, संतुलित आहार घ्यावा.
2) प्राथमिक अवस्थेतील संधिवातावर उपचार :
ए) औषधे : वेदनाशामक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास फरक पडतो बी) सांध्यातील द्रव्याचे सबस्टीट्युटचे इंजेक्शन घेणे, सी) सांध्यातील अस्थिबंधाचे दुर्बिणीद्वारे पुनर्रचना व दुरूस्ती करणे डी) सांध्यातील लुज बॉडीज दुर्बिणीद्वारे काढुन घेणे ई) हाय टिबीयल ऑस्टीओटॉमी
3) अंतीम अवस्थेतील संधिवाताच्या आजारावरील उपचार :
ए) युनिकॉडीलास नी रिप्लेसमेंट सर्जरी(युकेआर) (गुडघ्याची अंशत: कृत्रीम सांधारोपण शस्त्रक्रिया) बी) टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी (टिकेआर) गुडघ्याची संपुर्ण कृत्रीम सांधारोपण शस्त्रक्रिया या शस्त्रक्रियेमध्ये सांध्यातील पृष्ठभाग बदलुन कृत्रीम पृष्ठभाग टाकले जातात.
शस्त्रक्रियेचे फायदे : सांद्यातील वेदना कमी होतात. सांध्यांची हालचाल पुर्ववत होते, पायर्या चढणे, मांडी घालुन बसणे सहज शक्य होते.
4) नी ऑर्थोडेसीस : या शस्त्रक्रियेमध्ये वेदना कमी होतात. परंतु सांध्यांची हालचाल होत नाही.
डॉ. दिपक अग्रवाल
अस्थिरोग तज्ञ, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय,जळगाव