राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत पटकविला द्वितीय क्रमांक; महाविद्यालयाकडून कौतुकाचा वर्षाव
जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थीनी पलक पटेल हीने राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविला आहे. पलक पटेल आता आंतरराज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे नुकतीच राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाची विद्यार्थीनी पलक पटेल ह्या विद्यार्थीनीने इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी या विभागातून सादरीकरण केले होते.
यात ३ ते ६ वयोगटातील व्यंग असलेल्या मुलांसाठी पाय सरळ पडून म्युजिक आणि लाइट लागेल अशा बुटाचे संशोधन केले. या अविष्कार संशोधन स्पर्धेत पलक पटेल हिने द्वितीय क्रमांक पटकविला. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते पलक पटेल हिला गौरविण्यात आले. पलक पटेल ही आता नाशिक येथे दि. ११ व १२ जानेवारीमध्ये होणार्या आंतरराज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे. पलक पटेल हिला डॉ. प्रज्ञा महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. पलक पटेल हिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्यासह प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी यांनी कौतुक केले आहे.