रोटरी क्लब जळगांव इ-लाईट तर्फे लिजेंड लीग बॉक्स किक्रेट स्पर्धा उत्साहात

0
37

जळगाव : रोटरी क्लब जळगांव इ-लाईट तर्फे नुकत्याच ४५ हुन अधिक वय असलेल्या सदस्यासाठी बॉक्स किक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. सदर स्पर्धेत सुमारे १२ संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा हि अतिशय उत्साहात व खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. ४५ वय व त्याहुन अधिक वयाचे रोटरीयनसाठी बॉक्स किक्रेट व त्याव्दारे निधी अभिनव उपक्रम राबविला.सदर संकल्पना हि रोटरी इ लाईट जळगांव यांनी प्रथमच साकारली असुन या स्पर्धेत जमा होणार्‍या रकमेत सपने सच होगे हा उपक्रम घेतला जाणार आहे.

या उपक्रमामध्ये गरीब मुलांना सहलीला दिल्ली येथे नेण्यात येणार असुन तेथील प्रेक्षणीय स्थळे, तसेच राजकारणी, समाजकारणी व उद्योग क्षेत्रातील व्यक्तीची भेट घालुन मुलांचे राजकीय उद्बोधन करण्याचा एक प्रयत्न रोटरी क्लब इ-लाईटच्या माध्यमातुन होत आहे. सदर बॉक्स किक्रेटच्या उद्घाटन प्रसंगी मा. आमदार संजय सावकारे, मेंबर्स ऑफ गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील, कार्डिओलॉजीस्ट), माजी महापौर विष्णु भंगाळे, क्लबचे अध्यक्ष अजित महाजन, सहकारी अभिषेक निरखे, प्राजेक्ट डायरेक्टर राजीव बियाणी व शहरातील प्रख्यात असे व्यक्तीची उपस्थिती होती.स्पर्धेचे प्रायोजकत्व गोदावरी फाऊंडेशन यांचे होते.तसेच सह प्रायोजकत्व म्हणुन प्रथमेश टेन्ट हॉऊस व गणेश लॅम्प प्लॉयर हे होते. सदर स्पर्धा २ दिवस घेण्यात आली व त्यात गोल्ड सिटी क्लबने जेतेपद पटकावले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here