जळगाव : कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना व्यक्तिमत्व हा प्रगतीचा मूलभूत आधार असतो स्वतःचे व्यक्तिमत्व विकास व संवर्धन करणे खूप आवश्यक असते.याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक वर्गांसाठी व्यक्तिमत्व विकास व संवर्धन या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक ११ ते १५ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. कार्यशाळेप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा. रम्या कनन यांच्यासोबत प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रा. रम्या कनन मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी व्यक्तिमत्व विकास याबद्दल माहिती सांगताना त्यांचे महत्त्व विशद केले. व हे व्यक्तिमत्व संवर्धन करणे नियमित गरजेचे असते जेणेकरून दैनंदिन जीवनामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला प्रकर्षाने उपयोगात आणता येतात, असे नमुद केले.
त्यानंतर प्रथम दिवसाच्या सत्रात प्रा. रम्या कनन मॅडम यांनी स्वतःला ओळखणे व सांघिक काम करण्याची कार्यपद्धती या विषयांवर मार्गदर्शन केले.याबाबत बोलताना त्यांनी प्राध्यापक वर्गांकडून प्रात्यक्षिक करून घेतले व त्याद्वारे या विषयांचे महत्त्व समजावून सांगितले.त्याचप्रमाणे त्यांनी सर्व प्राध्यापकांची ओळख करून घेऊन, मानसिक वागणूक बद्दल मार्गदर्शन केले.प्रथम दिवशीच्या सत्रात सर्व प्राध्यापकवर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अमित म्हस्कर यांनी केले.