जळगाव : गर्भावस्थेच्या जेमतेम 5 ते 7 महिन्यात जन्म झालेल्या आणि अवघे 400 ते 600 ग्रॅम वजन असलेल्या अशा नवजात अर्भक आणि अत्यावस्थ बालकांच्या उपचारासाठी उपलब्ध अत्याधुनिक साधने आणि तज्ञ डॉक्टरांची 24 तास सेवा यामूळे डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचा बालरोग विभाग जीवनवाहीनी ठरतोय.
रूग्णालयातील बालरोग विभागात नवजात शिशू व बालकांवर उपचारासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर डॉ. सुयोग तन्नीवार, डॉ अनंत बेंडाळे, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. गौरव पाटेकर यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. प्रज्ञील रांगणेकर, डॉ. सुरूची शुक्ला, डॉ. रोहीणी देशमुख,डॉ.दर्शन राठी, डॉ. चंदा राणी आणि डॉ. शिवानी गायकवाड या तज्ञ डाक्टरांची टीम 24 तास कार्यरत आहे.
या शिवाय नवजात शिशूंंना जिवनदायी काचेच्या पेटयासह अत्याधुनिक सुविधांनी युक्त अतिदक्षता विभागामूळे बालरोग विभाग नवजात शिशू व अत्यावस्थ बालकांसाठी जीवनवाहीनी ठरत आहे. बालरोग शल्यचिकीत्सक सुवर्ण पदक विजेते डॉ. मिलींद जोशी हे देखिल कार्यरत असल्याने बालकांच्या शस्त्रक्रिया ताबडतोब होवून बालकांना जीवनदान मिळत आहे.
सामान्यपणे अनेकवेळा कमी वजनाच्या बाळांना श्वास घ्यायला त्रास होते श्वास देण्यासाठी ट्यूब टाकावी लागते व फुफ्फुसे श्वासासाठी खुले करणारी औषधे तसेच नाळेतून औषधे आणि पोषक आहार दिला जातो. 24 तास बारकाईने लक्ष जात असल्याने बाळाला जिवनदान मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.