जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि अशीच एक आरोग्य योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिक दुर्बल, वंचित नागरिकांना शासनाने निर्धारित केकेल्या सूचीबद्ध शासकीय / निमशासकीय किंवा धर्मादाय रुगांलयात गंभीर आजारांमध्ये, नागरीकांना या योजनेंतर्गत विमा संरक्षण देऊन मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो. डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मार्थ रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी रुग्णालयात स्वतंत्र माहिती कक्ष उभारण्यात आला असून तेथील आरोग्य मित्रातर्फे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन केले जाते.
राजीव गांधी जीवनदायी योजना दिनांक 1 एप्रिल 2017 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली, तसेच महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी एक कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे, या सेंटरच्या 32 लाईन्स व्दारे नागरिकांसाठी चोवीस तास कॉल करण्याची सुविधा उपलब्ध राहील, नागरिक या सुविधेचा उपयोग तीन प्रकारे करू शकतील आजारी रुग्णालयात उपचार घेताना व रुग्णलयातून घरी परतल्यानंतर आणि आजाराबद्दल नंतर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आजारांच्या उपचार प्रक्रियेमधील आजाराच्या उपचारासाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण दरवर्षीप्रमाणे प्रतीकुटुंब दोन लाख इतकी ठेवण्यात आली आहे, तसेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हि मर्यादा वाढूऊन तीन लाख दरवर्षीप्रमाणे प्रतीकुटुंब करण्यात आली आहे, या मध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश राहील, तसेच या योजनेंतर्गत उपचार सुरु होण्याआधी असलेल्या आजारांचा उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश
राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कुणाला?
या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले,शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेतांना योग्य ते सहाय्य व मदत करतात. रुग्णांची नोंदणी आरोग्य मित्रामार्फत केली जाते. रुग्ण नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाची पडताळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या कागद पत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळते.
ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य मित्राची भूमिका
या योजनेमध्ये समविष्ट असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोदणी, रुग्णांना उपचारा दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशा प्रत्येक अंगीकृत रुग्णालया मध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहे.