जळगाव : ईएसआयसी (ESIC) योजनेंतर्गत कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाला वैद्यकिय सुविधा पुरवल्या जातात. तब्येत बिघडल्यास मोफत इलाजाची सुविधा मिळते. ESICच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मोफत इलाज केला जातो. गंभीर आजार असल्यास खासगी रुग्णालयात पाठवले जाते. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर इलाजाचा संपूर्ण खर्च ESIC द्वारा केला जातो. डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मार्थ रुग्णालयात ईएसआयसीची सुविधा उपलब्ध आहे.
डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मार्थ रुग्णालयात ईएसआयसी योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी तेथे स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथील मार्गदर्शक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन करुन वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देतात. डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मार्थ रुग्णालयात रक्त, लघवी, एक्सरे, एमआरआय, सीटीस्कॅनसह अन्य प्रकारच्या सर्व टेस्ट एकाच छताखाली उपलब्ध असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचतो व रुग्णांना जलद व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होते.
ईएसआयसी योजना काय आहे?
सर्वसाधारणपणे कामगार मंत्रालय कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांना विमा सुविधा प्रदान करते. ज्यांना स्वस्त उपचार किंवा नि: शुल्क उपचार मिळतात. याचे नाव कर्मचारी राज्य विमा महामंडळ असे आहे. खाजगी क्षेत्रातील कंपन्या किंवा कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना याचा फायदा होतो. ही सुविधा कमी पगाराच्या लोकांसाठी देखील आहे.
ईएसआयसी अंतर्गत सहा प्रकारचे लाभ
(मेडिकल बेनिफिट) : नोंदणीकृत कामगारांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मिळतात राज्य कामगार विमा रुग्णालयातून मोफत उपचार
(फिटनेस बेनिफिट) : प्रसूती काळात व प्रसूतीनंतर देय रजेच्या 70 टक्के पगार संबंधित महिलेला दिला जातो
(डिपेंडंट बेनिफिट) : कामावर असताना मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या पत्नीस पगाराच्या तुलनेत 60 टक्के पेन्शन तर मुलास मिळते 40 टक्के पेन्शन
(परमनंट डिसेबल बेनिफिट) : काम करताना बोट, डोळा, पाय तथा अन्य अवयव निकामी झाल्यास एकूण पगाराच्या पाच टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते
(अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना) : नोकरी गेल्यानंतर मिळतो तीन महिन्यांचा 50 टक्के पगार
(मॅटर्निटी बेनिफिट) : कामावर असताना मृत्यू झालेल्या कामगाराच्या अंत्यविधीसाठी दिले जातात 15 हजार रुपये
कामगार विमा योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मिळतात मोफत उपचार
फिटनेस बेनिफिट अंतर्गत नऊ महिन्यांनंतर कामगारांना मिळतो देय रजेतील 70 टक्के रकमेचा लाभ
कामावर असताना मृत्यू झालेल्या कामगाराच्या पत्नीस वेतनाच्या तुलनेत 60 टक्के तर मुलांना मिळते 40 टक्के पेन्शन
कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात वंध्यत्व आल्यास मिळते पगारीच्या तुलनेत पाच टक्के पेन्शन
कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत मिळतात 15 हजार रुपये
नोकरी गेल्यानंतर अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेतून संबंधित कामागाराला मिळते तीन महिन्यांचे 50 टक्के वेतन