डॉ. उल्हास पाटील विद्यालयाच्या कृषीकन्यांनी केले लम्पी आजाराबाबत मार्गदर्शन

0
45

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पशूधन लम्पी आजारामुळे धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे फैजपूर येथे लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे वैशिष्ठ म्हणजे, महाविद्यालयातील कृषीकन्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. कृषीकन्या वैशाली रोडे, सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांचा यात समावेश होता. यावेळी पशु चिकित्सक डॉ. प्रमोद सुरवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी या भागातील अनेक जनावरांची तपासणी कृषी कन्यांनी केली. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना लम्पी त्वचा रोगाबददल माहिती देतांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग किटकांपासून पसरतो. माश्या आणि डास तसेच विशिष्ट प्रजातीच्या उवांमुळे लम्पी आजार पसरतो. या आजाराची लक्षणे लम्पी, त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. तसेच डोळे आणि नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, दुध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात.

या आजारामुळे जनावरे दगावू नये यासाठी गोठ्यात माशा, डास होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून विभक्त ठेवावे. बाधित जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. याबददल माहिती देखील देण्यात आली. या तपासणीसाठी डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सपकाळे, डॉ. शैलेश तायडे, डॉ. अशोक चौधरी, डॉ. एस एम पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी कृषि महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमानंतर परिसरातील जनावरांची तपासणी तज्ञांकडून करण्यात येवून मार्गदर्शन देखील करण्यात आले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here