गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात कोर इलेक्ट्रॉनिक्स विषयावर कार्यशाळा

0
32

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे दिनांक १ ते ७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कोर इलेक्ट्रॉनिक्स या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील सेनसाटा टेक्नॉलॉजी प्रायोजित कार्यशाळा लेवाभातृ मंडळ पुणे व इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर नाशिक द्वारा संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, लेवा भातृ मंडळाचे श्री पुरुषोत्तम पिंपळे आणि श्री कृष्णाजी खडसे तसेच इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटरचे संजय चौधरी हे उपस्थित होते.

मान्यवरांचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी महाविद्यालयात अशा प्रकारच्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवणे गरजेचे असते जेणेकरून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढीस लागेल असे आवाहन केले.डॉ. उल्हास पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थी हा अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणे ही काळाची गरज आहे जेणेकरून जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांची ओळख होईल. पहिल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटरचे संजय चौधरी यांनी रेझिस्टन्सचे विविध प्रकार आणि कार्यप्रणाली या संदर्भात विस्तृत माहिती देऊन रझिस्टन्सच्या व्हॅल्यू ओळखण्याचे ट्रेनिंग दिले. दुसर्‍या दिवशी विद्यार्थ्यांना प्रिसेट व कॅपॅसिटर चे प्रकार व त्याच्या व्हॅल्यू संदर्भात तसेच त्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यशाळेच्या पुढील दिवसांच्या सत्रा मध्ये विद्यार्थ्यांना मिनी प्रोजेक्ट चे डिझाईन तसेच ट्रान्सफॉर्मर प्रकारचे रिले तसेच डायस व ट्रायस यांचे टर्मिनल ओळखणे तसेच टेस्टिंग याबद्दल माहिती देत प्रात्याक्षिक करण्यात आले.ब्रेड बोर्ड डिझाईन पॉवर सप्लाय डिझाईन यांचे प्रात्यक्षिक सांगून त्यांच्याकडून हँडस ऑन प्रॅक्टिस करून घेण्यात आली.कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सेनसाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे सतीश बोरोले, चैतन्य कुलकर्णी व ऋषिकेश रानावरे हे उपस्थित होते.

सेनसाटा टेक्नॉलॉजी चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश बोरोले यांनी त्यांचे मत मांडताना विद्यार्थ्यांना सांगितले की तंत्रज्ञान हे नेहमी अद्ययावत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सेनसाटा टेक्नॉलॉजी ही नेहमी प्रयत्नशील असते कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.सदरील कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. अतुल बर्‍हाटे, प्रा. महेश एन पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम पहिले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सेजल सातव व आभार प्रदर्शन प्रा. शफीकुर रेहमान यांनी केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here