जळगाव : १७ वर्षीय क्षयरोगी तरूणाला अचानक श्वास घ्यायला त्रास होवू लागला.यातच हा तरूण अत्यावस्थ झाल्याने त्याला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थीतीचे भान ठेवून मेडिसिन तज्ञांनी तातडीने ऑक्सीजन लावून ८ दिवस केलेल्या योग्य उपचाराने जीवनदान मिळाले आहे. या तरूणावर गेल्या काही वर्षापासून क्षयरोगाचे उपचार सूरू होते. अत्यंत हलाखीची परिस्थीती असलेल्या तरूणाचा हा लढा सूरू असतांना अचानक एक दिवशी त्याला श्वास घेण्यास अडचण होवू लागली.त्याला कृत्रिम श्वासोश्वास देणे गरजेचे होते. याच अवस्थेत नातेवाईकांनी त्यास डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.
येथील तज्ञांनी परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी तरूणास कुत्रिम श्वासोश्वास दिल्यानंतर काही चाचण्या करून घेत उपचारास सूरूवात केली.रूग्णालयात एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असल्याने तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सूरू ठेवले. रूग्णाला योग्य त्या औषधी आणि रक्तपुरवठा केल्यानंतर ८ दिवसात हा रूग्ण पुर्णपणे बरा झाला. पुढील क्षयरोग उपचाराची यावेळी नातेवाईकांना सुचना करून रूग्णालयातून सूटी करण्यात आली. क्षयरोग एक संक्रामक रोग आहे मायकोबैक्टीरियम क्षयरोग जगभरातील मुख्य आरोग्यविषयक समस्यांपैकी, विशेषतः विकसनशील देशांमध्ये, एक आहे. असा अंदाज आहे की जगातील एक-तृतीयांश लोक याने प्रभावित होतात. हा एक संक्रामक रोग असून संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात पसरतो.
शरीरात प्रवेश केल्यानंतर, क्षयरोगवाहक सामान्यतः फुफ्फुसामध्ये बंद होतात. रोगवाहक फुफ्फुसावर प्रतिकूल परिणाम करतात, ज्यामुळे खोकला, रक्ताची थुंकी, ताप आणि वजन कमी होणें अशी लक्षणे दिसतात.कधीकधी, हे हाडे, मेनिंग्ज (मेंदूचे आवरण), मूत्रपिंड आणि आतड्यांनाही प्रभावित करते. क्षयरोगाचा सामान्यत: अँटी कोच औषधांद्वारे उपचार केला जातो आणि रोगाचा प्रकार आणि तीव्रता यावर उपचार सामान्यतः सहा महिने ते तीन वर्ष टिकते. एखाद्या व्यक्तीला वेळेवर योग्य उपचार मिळत असल्यास, उपचारांची टक्केवारी जवळजवळ टक्के आहे. परंतु कधीकधी, क्षयरोग पुन्हा जडून किंवा गंभीर प्रकरणात मृत्यूही होऊ शकतो.