प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

0
47

गोदावरी नर्सिंगच्या बालआरोग्य विभागाचा उपक्रम

जळगाव – स्व-संरक्षण करणे स्वत: शिकायला हवे याचा धडा येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या बालआरोग्य विभागातर्फे  विकास विद्यालय जळगाव खुर्द व न्यु इग्लिश मिडीयम स्कुल , सरोदे विद्यालय नशिराबाद, छावरा इंटरनॅशनल सावदा, जयहिंद स्कुल कडगाव येथे कराटे शिक्षक अभिजित जाधव यांनी दिले.
दि 9 ते 13 संप्टेबर पर्यंत चालणा या या प्रशिक्षण कार्यक्रमात दि 9 रोजी विकास विदयालय जळगाव खुर्द, 10रोजी न्यु इग्लिश स्कुल तर 11 सरोदे विदयालय नशिराबाद, 12 रोजी चावरा इंटरनॅशनल सावदा तर 13 या प्रशिक्षणाचा समारोप जयहिंद स्कुल कडगाव येथे समारोप करण्यात आला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थींनीना गुड टच व बॅड टच तसेच कराटे प्रशिक्षण देत स्वसंरक्षाणाचे धडे देण्यात आले. बालआरोग्य विभागाच्या प्रमुख प्रा अश्‍वीनी मानकर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा. रूचीता समरीत, प्रा. श्‍वेता लांडगे, प्रा वैभव खरे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here