सावदा : येथील २०० वर्षे पुरातन काळभैरव, म्हाळसा देवी, खंडेराव मंदिराचा नवरात्रीचा भंडारा शुक्रवारी उत्साहात झाला. यावेळी गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते म्हाळसादेवीची महाआरती करण्यात आली.
सावदा येथे २०० वर्षांपूर्वी पासून धनगर वाड्यात कालभैरव, म्हाळसादेवी, खंडेराव मंदीर आहे. २०१२ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाला. १२ वर्षांपासून ठेचा व कळण्याची भाकरीचा नवरात्रीचा भंडारा येथे होत आहे. नवरात्रौत्सवानिमीत्त म्हाळसा देवीची डॉ. केतकीताई पाटील व डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते आरती होऊन महाप्रसादाची सुरुवात झाली.
या भंडार्यामध्ये सावदा व आसपासच्या गावातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावर्षी ६ क्विंटल कळण्याची भाकरी व ४ क्विंटल ठेचाचा महाप्रसाद होता. यशस्वीतेसाठी म्हाळसादेवी मित्र मंडळ, माताराणी दुर्गाउत्सव मंडळ व जगमाता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.