मुक्ताईनगर : मनात गोष्टी साचून राहिल्यास समस्यां निर्माण होतात असे प्रतिपादन डॉ. केतकीताई पाटील यांनी केले. त्या डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन आयोजित जगावे आनंदे मेंटल हेल्थ कार्यक्रमात बोलत होत्या . सदर कार्यक्रम मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बुधवार रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी मंचावर सपोनि संदीप दूण गहू. सपोनि आशिष आडसूळ , डॉ. केतकीताई पाटील , डॉ. विलास चव्हाण , डॉ. बबन ठाकरे, डॉ. सौरभ भुतांगे उपस्थित होते.
सपोनि दूणगहू यांनी प्रास्तविक करतांना सर्वच क्षेत्रात मानसिक आरोग्याची गरज भासते . हा न ओळखू येणारा आजार आहे. मानसिक जागृती गरजेची आहे असे सांगितले. डॉ. केतकीताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या मनात जी कुजबुज आहे त्यासाठी मानसिक आरोग्य आहे. आपले काम करून कुटुंब स्टेबल ठेवणे हे म्हत्वाचे काम असते. मनात काही गोष्टी साचून ठेवलेल्या असतात त्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी आपले छंद जोपासले पाहिजे. आपल्याला मानसिक आरोग्याची गरज आहे हे स्वीकारले पाहिजे.
जशा जबादारी वाढत जातात तसतसा संवाद कमी होत जातो. त्यामुळे व्यक्त झाले पाहिजे. व्यक्त झाले कि तणाव कमी होतो.डॉ. विलास चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात स्ट्रेस हा प्रत्येक घरापर्यंत पोहचला आहे . आत्महत्त्या करणारी व्यक्ती दोन ते तीन महिने स्ट्रेसमध्ये असते. या आजारावर उपचार आहे . यावर आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागत नाहीत . निर्णय घेण्यास विलंब होणे, छातीत धडधडने, शरीर दुखी वाढत जाणे, चिडचिड होणे हि लक्षणे असल्याचे सांगितले.
डॉ. बबन ठाकरे यांनी कोरोनानंतर या आजराग्रसतांचि संख्या वाढली आहे . सकारात्मक विचार आणि दृष्टी महत्वाची आहे . कोणत्या गोष्टी तुम्ही कशाप्रकारे हाताळतात यावर बरेच काही अवलंबून आहे असे सांगितले . डॉ. सौरभ भुतांगे यांनी मानसिक आरोग्याची गरज असणे म्हणजे कमजोरी आहे असे नाही असे सांगत अनेक उदाहरणे दिली.या नंतर उपस्थितांच्या शकांचे समाधान करण्यात आले. कार्यक्रमाला मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव , सावदा येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते