जळगाव : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मी काय विचार करतो, मी कसा समजू शकतो, आणि मी कोण आहे या ३ क्युचे महत्व ज्याला समजले तो यशस्वी होतो असे मत डॉ. सचिन परब यांनी आज व्यक्त केले. डॉ. उल्हास पाटील वेद्यकिय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात प्रजापिता ब्रम्हकुमारी वैद्यकिय शाखा आणि डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या सयुक्त विदयमाने आयोजित तणाव व्यवस्थापनाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
पुढे बोलतांना त्यांनी तणाव आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतो. खरंतर, अति तणावामुळे आपल्या शरीरात कोर्टिसोलचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तुमची उत्पादकताही कमी होऊ शकते. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट शिकणं फार गरजेचं आहे. अनेक छोट्या छोट्या उपक्रमांच्या मदतीने तुम्ही तणाव कमी करू शकता. स्ट्रेस मॅनेजमेंट करून तुम्ही कोणत्या मार्गांनी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो हे जाणून घेऊयात. शारीरिक अॅक्टिव्हिटी करा,आपल्या छंदासाठी वेळ काढा,ध्येय निश्चित करा,कुटुंब किंवा मित्रांबरोबर वेळ घालवा,पुरेशी झोप घ्या असे सांंगितले.
यावेळी त्यांच्यासोबत वसुधा दीदी, जळगावचे प्रसिध्द रेडीओलॉजीस्ट डॉ. किरण पाटील ,वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. शुभांगी घुले— वाघ यांचेसह तज्ञ डॉक्टर प्राध्यापक आणि विदयार्थी उपस्थीत होते. मान्यवरांनी चित्रफितीच्या माध्यमातून यशाची त्रीसुत्री विषद केली. यावेळी विदयार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसन करण्यात आले. वैष्णवी वानखेडे, पायल पाटील आणि सम्रांज्ञी देशमुख यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णलयाच्या शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.