जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या मस्कुलोस्कॅलेटल विभागातर्फे विश्व हिंदी दिनानिमित्त पाच मिनीटात हिंदी भाषण ही स्पर्धा घेण्यात आली. विश्व हिंदी दिनानिमीत्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या मस्कुलोस्कॅलेटल विभागातर्फे हिंदी पारंपारिक ज्ञान आणि कृत्रीम बुध्दीमत्ता या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासन अधिकारी राहुल गिरी व प्राध्यापक, डॉक्टर उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम वर्षाची विद्यार्थीनी वैष्णवी गुट्टे हीने प्रथम क्रमांक पटकविला. तर द्वितीय डॉ. प्रथमेश जोशी आणि धनश्री साळी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून डॉ. अस्मिता काडेल आणि डॉ. अनुराग मेहता हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रज्ञा महाजन आणि डॉ. पी.के. अभिलीप्शा यांनी केले होते. सुत्रसंचालन डॉ. स्नेहा तिवारी आणि डॉ. वैष्णवी अग्रवाल यांनी केले.