जळगाव : जळगाव : कान-नाक-घसा विकार असतील तर आता चिंता नको…खेड्यापाड्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले जात असून नाक कान घसा तज्ञ देखील तपासणी करणार असून पुढील उपचार देखील आता पोर्टेबल एन्डोस्कोपी अर्थातच दुर्बिणीद्वारे कान-नाक-घशाची तपासणी केली जाणार आहे. गोदावरी फाऊंडेशनतर्फे जळगाव, बुलढाणा जिल्ह्यातील गावागावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जात आहे. एकाच दिवशी तीन ते चार गावांमध्ये आरोग्य शिबिरं घेतले जात आहे.
शिबिरस्थळीच रुग्णांच्या कान-नाक-घशाच्या आजाराची तपासणी तज्ञांकडून केली जात आहे. तसेच ज्या रूग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता आहे अशा रूग्णांसाठी अद्यावत पोर्टेबल एन्डोस्कोपी मशिन उपलब्ध करण्यात आली. इएनटी तज्ञांद्वारे रुग्णाच्या आजारानुसार कान, नाक किंवा घशाची तपासणी केली जाणार आहे. अद्यावत मशिनद्वारे आजाराचे निदान सोयीचे होत असून याचा फायदा शिबिरार्थींना घेता येणार आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी डॉ.केतकीताई पाटील यांनी केले.