जळगाव : अन्ननलिका, जठर, आतडे, लिव्हर, स्वादुपिंड पित्ताशय हे शरीराचे प्रमुख अंग असून बऱ्याचदा सोनोग्राफी, सीटी स्कॅन तपासणीतून वरील आजारांचे निदान होत नाही. दारूमूळे लिव्हर, पोट, व अन्ननलिकेचे आजारही अनेक वेळा जीवघेणे होतात मग अशा वेळी काय करावे असा प्रश्न रूग्ण व नातेवाईकांना पडत असतो. रुग्णांच्या सुविधेसाठी डॉ. उल्हास पाटील वेद्यकिय रूग्णालयाच्या गॅस्ट्रोइंन्टरोलॉजी विभागात एन्डोस्कोपी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून एन्डोस्कोपीव्दारे विविध आजारांचे निदान केले जाणार आहे. दर गुरूवारी सकाळी ९ ते १ हे शिबिर सूरू राहणार आहे.
रूग्णांना गिळतांना त्रास होणे, अॅसिडीटी, अपचन, उल्टी, पोटात दुखणे पॅनक्रियाटायटीस, पोट व आतड्यांचा अल्सर, छाती व पोटात मळमळ, वारवार जूलाब व बध्दकोष्टता, उल्टी किंवा शौचातून रक्त येणे, लिव्हर, काविळ, पोटात पाणी होणे आणि लिव्हर सिरॉसिस जाणवतात पण दुर्लक्ष केले जाते या सर्व आजारांवर अचूक उपचार करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात गॅस्ट्रोइंन्टोरोलॉजी एन्डोस्कोपी शिबिराचे आयोजन केले आहे.
शिबिरात प्रसिध्द सर्जन तपासणी करणार असून गॅस्ट्रोइन्टोरोलॉजीस्ट डॉ. भुषण चोपडे यांची देखील सेवा उपलब्ध करून दिली आहे. वरील आजांरावर उपचाराचा भाग असलेली एन्डोस्कोपी देखील अत्यल्प दरात केली जाणार आहे. याचबरोबर कोलोनोस्कोपी व इतर तपासण्या देखील अल्पदरात केल्या जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. मैत्रेयी बिरादर यांचेशी ८४०८८३१२०२ या क्रमांकवर संपर्क साधावा. महिन्याच्या प्रत्येक गुरूवारी हे शिबिर सूरू राहणार आहे.
अशी लक्षणे असतील तर तातडीने तपासणी करा
अन्ननलिका, जठर, आतडे, लिव्हर, स्वादुपिंड आणि पित्ताशयाचे आजार, पोटात पाणी होणे, पोट फुगणे, लिव्हरवर सूज, काविळ, पित्ताशय आजार, पित्ताशय खडा किंवा इन्फेक्शन, रक्ताची उलटी, वारंवार उलटी, पोटदुखी, संडासच्या जागेवर जळजळ, लघवीतून सतत रक्त जाणे, अॅसिडीटी अपचन, छाती व पोटात जळजळ, अशी लक्षणे रूग्णांमध्ये असतील तर त्यांनी ताबडतोब या शिबिरात तपासणी करावी.