जळगाव : येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या फ्रेशर्स पार्टीत बॉलीवूड गीतांसह देशभरातील विविध प्रांतामधील पोषाखातून राष्ट्र एकात्मतेचा संदेश दिल्याचे दिसून आले. या फे्रशर्स पार्टीत विद्यार्थ्यांनी प्रचंड धम्माल केली. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अंतरंग २४ अंर्तगत फ्रेशर्स पार्टीचे आयोजन वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, प्राचार्य विशाखा गणवीर, प्राचार्य शिवानंद बिरादर, प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. जसनीत दाया, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
नविन आलेल्या विदयार्थ्यांनी अखंड भारतातील विविध प्रातांची वेशभुषा यावेळी रंगमंचावर सादर करतांना गायन, वादन व नृत्य कला सादर केल्यात. या कार्यक्रमात विविध खेळ आणि स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक देखिल सादर केला. यातील प्रथम वर्षाचा उदय सोनवणे हा मिस्टर फे्रशर्स तर मिस फ्रेशर्स म्हणून जान्हवी सोनवणे यांची निवड करण्यात आली. मिस्टर आयकॉनिक म्हणून प्रथम पाटील व मिस आयकॉनिक छाया तनवान यांना देण्यात आले.
तसेच डॉ. केतकी पाटील स्कूल ऑफ नर्सिंगचे मिस्टर फ्रेशर सचिन निंबाळकर, मिस फ्रेशर चैताली कोळी यांची निवड करण्यात आली. परिक्षक म्हणून प्रा. जसनित दाया, प्रा. निर्भय मोहन यांनी काम पाहीले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतीम वर्षाची स्वराज्य बॅच आणि प्रा. पियूष वाघ, प्रा. सुमैय्या, प्रा. अस्मिता जुमदे, प्रा. साक्षी गायकवाड, प्रा. कोमल काळे, प्रा. कल्याणी मेश्राम यांच्यासह गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.