गोदावरी फाऊंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये शिवजयंती उत्साहात

0
36

गोदावरी अभियांत्रिकीत शिवरायांचा जागर

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त शिवजन्मोत्सव देखावा सादर करून जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख पाहुणे अतुल मनोहर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे, प्रा. हेमंत इंगळे, प्रा. ईश्‍वर जाधव यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात ढोलताशांच्या गजरात शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सवाचा देखावा सादर करण्यात आला. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गड किल्ल्यांचे संगोपन याविषयावर पथनाट्य सादर केले. शिवरायांचा जयजयकार आणि पोवाड्यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर शिवशाहीमय झाला होता.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी शिवजयंती उत्कृष्टपणे साजरी केल्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमांमध्ये ढोल, ताशे, लेझिम व वक्तृत्व सादर करणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. वक्तृत्व विजेता मयुरी भोइ, र्तेजस सूर्यवंशी, लेझीम प्रकार विजेते- गणेश कोलते, मेघा सोनवणे, ढोल प्रकार विजेते- मयूर कोळी, सिद्धी खंदारे, ताशा प्रकार- तुषार पाटील यांना पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रांजल कापुरे व प्रांजल राजपुत या विद्यार्थिनीनी केले. शिवजयंती कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सचिन महेश्री, नीलेश चौधरी, सुरज चौधरी, चंद्रकांत शिंपी यांच्यासह प्राध्यापकांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

एमबीबीएसतर्फे मिरवणूकीत शिवजयंतीचा जल्लोष

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे शिवजयंतीनिमीत्त महाविद्यालय परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, सईबाई, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारण्यात आली होती. एमबीबीएसतर्फे सकाळी रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रा. बापूराव बिटे, रेक्टर गावंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सकाळी स्वच्छता अभियान देखिल महाविद्यालय परिसरात राबविण्यात आले. यात प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर चकाचक केला. शिवजयंतीनिमीत्त निबंध स्पर्धा, पोस्टर तयार करणे, प्रश्‍नमंजुषा, कविता सादरीकरण आणि छायाचित्र प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. यात निबंध स्पर्धेत अपूर्वा पाटील, पोस्टर तयार करणे हार्दीक जैस्वाल, प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत प्रतापगढ टीम, कविता सादरीकरणात शुभदा तोडकर आणि फोटोेग्राफीत पुर्वा सावरकर हे विजेते ठरले. दुपारी महाविद्यालय परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत शिवाजी महाराज यांची वेशभूषा पियुष कुकडे याने साकारली. यात ढोलताशा, लेझीम पथक सहभागी झाले होते. तसेच पथनाट्य देखिल सादर करण्यात आले.

सायंकाळी शिवपर्व हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. दिनानाथ रॉय, डॉ. धनंजय बोरोले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवनेरी किल्ल्याची कलाकृती साकारण्यात आली. तसेच तलवार बाजीचे प्रात्याक्षिक समृध्दी मुत्तेपवार, पोवाडा क्रीष्णकांत जाधव, वक्तृत्व राजनंदीनी पाटील, स्त्रीशक्ती विषयावर श्रावणी पाटील यांनी विचार मांडले. तसेच अपूर्वा पाटील हिने ताराराणी, सौरव तांबारे याने सरदार आणि अभिषेक पाटील याने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. सांस्कृतिक कार्यक्रमात आदित्य निर्वळ याने कविता सादर केली. तसेच याप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन पायल पाटील, साक्षी पिसे, स्वप्नील आढाव आणि अमित पाटील यांनी केले.

फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे शिवजयंतीचा उत्साह संचारला

जळगाव : डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फेही शिवजयंतीनिमीत्त कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. केतकी पाटील सभागृहात कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, डॉ. अनुराग, डॉ. अंकीता दास, डॉ. अभिलीप्सा उपस्थित होते. डॉ. सुयोग लंकेपिल्लेवाल यांनी शिवगर्जना सादर केली.

कार्यक्रमात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अफजल खान वधाचा देखावा विद्यार्थ्यांनी साकारला. तसेच पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. सुत्रसंचालन तेजस्वीनी व्यंकटवार, सृष्टी लाड, हिमानी सोनार यांनी तर आभार अंकीत राऊत याने मानले. यशस्वीतेसाठी सर्वेश पाटील, प्रतिक लहामगे, सुजय मानकर, शिवम राठोड, नीरज सपकाळे, गणेश दुधभाते, पूजा पुरोहित, श्रृती तांबट, सलोनी किर, स्नेहल राठोड, दामिनी तावडे, खुशी पट्टेबहाद्दूर, सुशांत शिसोदे, गौरव पवार, अमृता देशमुख, ओम चौधरी, वैष्णवी दळवे यांनी परिश्रम घेतले.

गोदावरी स्कूलमध्ये शिवजयंतीचा जल्लोष

जळगाव : गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. इयत्ता ७ वीचे विद्यार्थी श्रावणी पाचपांडे, विवेक पाटील यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या जीवनाची गौरवगाथा प्रस्तुत केली. इयत्ता ५वीचा विद्यार्थी हिमांशू महाजन याने शिवाजी महाराजांची शौर्यगाथा गायली. गोदावरी स्कूलचा विद्यार्थी व डान्स इंडिया डान्स मधील विजेता डान्स मास्टर दिवेश भदवेलकर याने शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथावर नृत्य सादर केले. यावेळी स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here