पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या उपयोगितेवर गोदावरी तंत्रनिकेतनमध्ये कार्यशाळा

0
62

जळगाव : गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या उपयोगितेवर पाच दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्ते पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय चे विद्युत् विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश सोनोने, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया चे विद्युत् व दूरसंचार विभाग प्रमुख प्रा. किशोर अकोले, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया चे विद्युत् विभाग चे प्रा. जय पंडित त्यांच्यासोबत गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. अतुल बर्‍हाटे ,शैक्षणिक समन्वयक प्रा. दीपक झांबरे विद्युत् विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते व इतर शिक्षक वृन्द उपस्थित होते.

मान्यवरांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पहिल्या सत्रात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी औद्योगिक क्षेत्रात मल्टीटास्किंगचे महत्त्व आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उद्योगातील ऑटोमेशनच्या वाढीसाठी महत्त्वाचे घटक कसे आहेत याबद्दल तर प्रा. जयप्रकाश सोनोने यांनी बीजेटी, पॉवर डायोड,आयजीबीटी आणि मॉसफिट सारखी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे या मुद्द्यावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात थायरिस्टर फॅमिली डिव्हाइसेस आणि तेथ व्हीआय वैशिष्ट्ये या मुद्द्यावर सोनोने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात प्रा. किशोर अकोले यांनी पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे मूलभूत आणि विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात पॉवर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कसे महत्त्वाचे आहे द्वितीय सत्रात एससीआर आणि पल्स ट्रिगर ट्रान्सफॉर्मर,ऑप्टो-कप्लर आधारित ट्रिगरच्या पद्धती चालू आणि बंद करायाबद्दल मार्गदर्शन करत नोकरी करताना आपल्या अभ्यासामध्ये कोणत्या गोष्टीचे ज्ञान असले पाहिजे व कंपनीमध्ये काम करताना कोणत्या गोष्टींचे ज्ञान असले पाहिजे या गोष्टीवर प्रा. किशोर अकोले यांनी भर दिला.

तिसर्‍या दिवसाच्या प्रथम सत्रात प्रा.अतुल बर्‍हाटे यांनी फेज कंट्रोल्ड कन्व्हर्टर- हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर व द्वितीय सत्रात एफडब्ल्युडी सह रेक्टिफायर,आर,आर एल बीएमओेस सिंगल फेज फुल वेव्ह नियंत्रित रेक्टिफायर बद्दल माहिती देत चौथ्या दिवशी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग- हँड्स ऑन प्रॅक्टिकलमध्ये अ‍ॅप्लीकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर प्रा. जयप्रकाश सोनोने यांनी याप्रसंगी पॉवर ट्रान्झिस्टरच्या कार्यप्रदर्शनावर हँड्स ऑन प्रॅक्टिकल घेतलेले विद्युत प्रवाह आणि त्यावरील व्होल्टेज या मुद्द्यावर आणि दुपारच्या सत्रात सिलिकॉन नियंत्रित रेक्टिफायरच्या कामगिरीवर हँड्स ऑन प्रॅक्टिकल घेतले आणि त्यावर लॅचिंग आणि धारण करंट या मुद्द्यावर प्रॅक्टिकल परफॉर्म करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पाचव्या दिवसाच्या कार्यक्रमात प्रा. जय पंडित यांनी फुल वेव्ह कंट्रोल्ड कन्व्हर्टर, हाफ वेव्ह कंट्रोल्ड कन्व्हर्टर, आणि त्यांचे ऑपरेशन आणि एक्सप्रेशन आणि आर आणि आरएल सारख्या विविध प्रकारच्या लोडमध्ये एकत्रीकरण. यानंतर विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्त्व भविष्यात पॉवर इलेक्ट्रॉनिक्समुळे आहे कारण इलेक्ट्रिकल व्हेईकल आणि औद्योगिक क्षेत्रात पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सची मागणी आहे. याबद्दल मार्गदर्शन करत समारोप केला. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्या डॉक्टर केतकी पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वीणा वानखेड़े यांनी केले कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नितिन पाटिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here