मित्रांनो, जागतिक मानसिक आरोग्य दिन १० ऑक्टोबर हा लोकांसाठी आणि एकूणच समाजासाठी ‘मानसिक आरोग्य हा एक सार्वत्रिक मानवी हक्क आहे’ या थीममागे एकत्र येण्याची संधी आहे. यामध्ये ज्ञान वाढविणे, जागरूकता वाढवणे आणि सार्वत्रिक मानवी हक्क म्हणून प्रत्येकाच्या मानसिक आरोग्याला प्रोत्साहन आणि संरक्षण देणारी कृती करणे याचा समावेश होतो.
मानसिक आरोग्य हा सर्व लोकांसाठी मूलभूत मानवी हक्क आहे. प्रत्येकाला, मग तो कोणीही असो आणि कुठेही असो, त्याला मानसिक आरोग्याच्या सर्वोच्च प्राप्त मानकाचा अधिकार आहे. या मध्ये मानसिक आरोग्याच्या जोखमी पासून संरक्षित होण्याचा अधिकार, प्रवेशयोग्य, स्वीकार्य आणि चांगल्या दर्जाची काळजी, स्वातंत्र्य आणि समाजामध्ये समावेश करण्याचा अधिकार यांचा समावेश होतो. चांगले मानसिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे.
व्यक्तीचे सामाजिक स्तर उंचावण्यासाठी मानसिक स्वास्थ आवश्यक असते. त्यात मानसिक आरोग्याच्या बाबतीत म्हटल्यास प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य खूप प्रमाणात वाढले आहे. थकज या आरोग्य संघटनांच्या मते २१वे शतक हे मानसिक ताणाचे असणार आहे. जागतिक स्तरावर आठपैकी एक व्यक्ती मानसिक आजाराच्या स्थितीसह जगत आहे, त्यामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य, त्यांचे कल्याण, त्यांचे इतरांशी संबंध आणि त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकते. मानसिक आजारांमुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मानवी हक्कांपासून दूर ठेवू नये. तरीही मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मानवी हक्कांची पायमल्ली होणारी अनेक उदाहरणे जगभरात आहेत.
अनेकांना सामुदायिक जीवनातूनदूर केले आहे. त्यांच्याशी भेदभाव केला जातो. तर असेच मानसिक आरोग्याचे मूल्य,प्रोत्साहन आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी डब्ल्यू एच ओ (थकज) त्याच्या भागीदारांसोबत काम करते. तातडीची कार्यवाही करून प्रत्येकजणत्याच्या मानवी हक्काचे वापर करू शकेल असे कार्य करते. इतर सर्वसामान्य आजार याप्रमाणेच मानसिक आजारांनाही स्वीकारले गेले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला वेडा म्हणण्यापेक्षा तो एका मानसिक आजाराने ग्रस्त आहे असे पाहावे. अशा मानसिक आरोग्य समस्याग्रस्त व्यक्तींना समजून घेऊन त्याच्या उपचारासाठी पुढाकार घेणे. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे. तज्ञांची मदत घेण्यात कुठलाही कमीपणा नाही. यासाठी समाजात जनजागृती होणे खूप महत्वाचे आहे.
बबन ठाकरे, समुपदेशक (मानसोपचार), डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालय