गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), युथ रेडक्रॉस विंग्स (वायआरसी), रोटरॅक्ट क्लब गोदावरी आणि स्टुडंट वेल्फेअर विभाग यांच्यावतीने रविवार दि.१५ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले असून यात ३० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून या दानामुळे अनेकांचे जीव वाचविले जातात, त्यामुळे रक्तदानाला विशेष महत्व असल्यामुळे गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रा.शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास डॉ.उल्हास पाटील रक्तपेढीचे सहाय्य लाभले.
यावेळी रासेयो कार्यक्रम प्रमुख प्रा.निम्मी वर्गीस, रासेयो कार्यक्रम प्रमुख प्रा.सुमित निर्मल, ट्यूटर ओमकार, ट्यूटर सुरज, रोटरॅक्ट क्लबचे सदस्य प्रा.पियुष वाघ, युथ रेडक्रॉसचे प्रा.प्रशिक चव्हाण, प्रा.शिल्पा वैरागडे, प्रा.रश्मी टेंभुर्णे, प्रा.श्वेता डहाके, प्रा.मोनाली बारसागडे, प्रा.रेबेका लोंढे, स्टुडंट वेल्फेअर विभागातील प्रा.मनोरमा कश्यप, प्रा.स्वाती गाडेगोने आदि उपस्थीत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.