जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बेल लॅबोरेटरी अमेरिका येथील शास्त्रज्ञ डॉ. सुनील पाटील यांचे कॅम्पस टू कॉर्पोरेट जर्नी या विषयावर इंडस्ट्रियल एक्सपर्ट टॉक दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच डॉ. नितीन भोळे (प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड ह्यूम्यानिटीज), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (प्रमुख,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स), प्रा.तुषार कोळी(प्रमुख, यंत्र विभाग), प्रा. महेश पाटील (प्रमुख विद्युत विभाग), प्रा. निलेश वाणी (संगणक विभागप्रमुख) तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी डॉ. सुनिल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी डॉ.सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध मुद्द्यांवर उदाहरणासहित समजावून सांगितले. शिक्षण घेत असताना बर्याचशा विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असतो, त्यावर यशस्वीपणे कसे सामोरे जायचे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयात असताना प्रत्येक गोष्टींमध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे असते. सॉफ्ट स्किल संदर्भात सांगताना आपण लिखाण, वाचन, प्रेझेंटेशन स्किल, अस्खलित बोलणे या गोष्टींवर काम करायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करीत असताना फॉरेन लँग्वेज चे महत्व कसे असते हे समजावून सांगितले तसेच आतापासून त्या लँग्वेज चा अभ्यास करणे आवश्यक असते. टीम वर्क मध्ये काम करत असताना गोष्टी या सोप्या होत असतात, त्यामुळे टीमवर्क गरजेचे असते. शिक्षण घेत असताना स्वतःचे स्वॉट अॅनालिसीस करणे गरजेचे असते. त्यावरून आपण स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस वर काम करू शकतो. विद्यार्थ्यांनी आतापासूनच हँडस ऑन प्रॅक्टिस वर भर देणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना सहज आणि सोपी वाटेल, तसेच त्यांनी मॉक्स कोर्सेस संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासक्रमाच्या बाहेरचे कोर्सेस या माध्यमातून करावे यासाठी चालना दिली.
या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या आसपासचे वातावरण पोषक असणे गरजेचे आहे, हे त्यांनी नमूद केले. सद्य परिस्थितीमध्ये इंटर डिसीप्लीनरी कोलॅबरेशन ची आवश्यकता आहे. अकॅडमीक च्या वेगवेगळ्या शाखांशी होणे गरजेचे आहे. तसेच टिचिंग इड सर्वीस नॉट अ जॉब असेही त्यांनी नमूद केले.अशा बर्याचशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सदस्य डॉ.केतकी पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खुशबू पाटील व डिंकी शदानी या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. तृषाली शिंपी या होत्या, त्यांनी डॉ.नितीन भोळे व डॉ.अनिल कुमार विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
डॉ.सुनील पाटील यांचा परिचय
डॉ. सुनील पाटील यांनी २२ वर्षे अमेरिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर ते पुणे येथील सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी मध्ये दहा वर्ष कार्यरत होते. त्यांनी जगभरामध्ये तसेच भारतामध्ये एज्युकेशन सिस्टीम या विषयावर सखोल असे काम केले आहे व त्याद्वारे सर्वांना मार्गदर्शन करीत आहे. तसेच त्यांनी एम्पॉवरिंग ऑफ फॅकल्टी इन इंजिनिअरींग एज्युकेशन या विषयावर पुस्तकाचे लिखाण केले आहे. तसेच त्यांनी बेल लॅब अमेरिका येथे काम केलेले आहे बेल लॅब मध्ये नानाविध शोधकार्य केले गेले आहेत.