जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगांव येथे विद्यार्थ्यांसाठी भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील जीवन या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून विंग कमांडर रवि सचिन (कमांडींग ऑफीसर ६, ए.एस.सी, एएफ), सर्जट डिगंबर सिंग, कॉर्पोरल भंवर सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, कार्यक्रम समन्वयक तथा टी.पी.ओ. डॉ विजयकुमार वानखेडे, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक विंग कमांडर रवि सचिन यांनी विद्यार्थ्याना भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील सेवा प्रवेशोत्तर जीवन, त्याचप्रमाणे वायुसेनेत भरती होण्यासाठीची पात्रता, विविध मार्ग, व परिक्षेसंबंधी मार्गदर्शन केले. त्यानंतर काही सूक्ष्म उपक्रम घेवून त्यांनी बक्षीस वितरण केले. सदर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. नवीन क्षेत्राबद्दलची माहिती मिळाल्याचा आनंद झाला. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ.केतकी पाटील यांनी कौतुक केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षक वर्ग तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयेश खडसे व आभारप्रदर्शन अदिती पवार या विद्यार्थ्यांनी केले.