गोल्डन अवर्समध्ये एमआयसीयूत रुग्णांची सेवा-सुश्रृषा

0
58

जळगाव – अत्यावस्थ परिस्थीतील रुग्णाला स्थिर करण्यासाठी आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात उपचाराची आवश्यकता असते, त्यादृष्टीने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील एमआयसीयू तयार केला असून येथे निष्णात आयसीयू तज्ञ व तंत्रज्ञांच्या मदतीने रुग्णाला गोल्डन अवर्समध्ये उपचार दिले जातात. तज्ञांचे अथक प्रयत्न व रुग्णाने औषधोपचाराला दिलेला प्रतिसाद यामुळे रुग्ण स्वत:च्या पायावर चालत घरी जातो, चला तर अतिदक्षता विभागाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या निष्णात आयसीयू तज्ञ डॉ.चंद्रेय्या कांते यांच्याकडून….

प्रश्न – एमआयसीयूतील सुविधांची थोडक्यात माहिती.
उत्तर – रुग्णालयातील एमआयसीयू हा अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज आहे. येथे बेडसाईडच एक्स रे, सोनोग्राफी तसेच डायलिसीस करण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक रुग्णांचे 24 तास मॉनिटरींग केले जाते. मजबुत यंत्रणा, प्रशिक्षीत स्टाफ येथे आहे. कार्डिओलॉजिस्टसह विविध स्पेशालिस्ट डॉक्टर्स येथे असल्याने कुठल्याही आजाराच्या रुग्णाची तातडीने तपासणी केली जाते.

प्रश्न – कुठल्याप्रकारच्या आजारावर आयसीयूत होतात उपचार
उत्तर – आयसीयूमध्ये सर्वच प्रकारच्या अत्यावस्थ रुग्णांवर तत्काळ उपचार केले जातात. विषबाधा, किडनी विकार, क्षयरोग, लॅप्रसी, अल्कहोलमुळे झालेले स्वादुपिंडाचे विकार, मधुमेही, डायबेटिक किटो, लकवा, हार्ट अटॅक, अतिरक्तस्त्रावामुळे रुग्ण शॉकमध्ये गेला असल्यासख, सर्पदंश, विंचू चावल्यास अशा आजारांवर तात्काळ उपचार आयसीयूत केले जातात. विविध प्रकारच्या उपचारपद्धतींसाठी रुग्णांना शिफ्ट न करता बेडसाईडच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

प्रश्न – रुग्णांचे मॉनिटरिंंग कसे केले जाते
उत्तर – अत्यावस्थेतील रुग्णांसाठी वेळ फार महत्वाचा असतो, त्यामुळे रुग्णाचा रक्तदाब नियंत्रित करणे, ऑक्सीजनची पातळी तपासणे त्यानुसार ऑक्सीन देणे, साखरेचे प्रमाण तपासणे, हृदयविकारी रुग्णाचा बेडसाईड टू डी इको करणे, औषधोपचार करणे, व्हेंटीलेटरही रुग्णाला लावले असल्यास त्याचीही तपासणी वेळोवेळी केली जाते, रुग्णांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर व्हेंटीलेटरवरुनही रुग्ण पुन्हा नॉर्मल होतो. रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यावर फिजीओथेरपीही दिली जाते. याशिवाय न्यूरो सर्जरीनंतर रुग्ण अत्यावस्थ असल्यास त्याचेही मॉनिटरिंग आयसीयूत केले जाते.

प्रश्न – सनस्ट्रोकच्या रुग्णांवरही उपचार होतो का
उत्तर –
नक्कीच होतो, आता उन्हाळा सुरु झाला असून अनेकदा सनस्ट्रोकचा त्रास रुग्णांना होतो, अशा रुग्णांना आयसीयूत अ‍ॅडमिट करुन टेम्परेचर कमी करण्याची उपचारपद्धती येथे उपलब्ध आहे.

प्रश्न – व्हेंटीलेटरबद्दलच्या समज-गैरसमजाबद्दल काय सांगाल
उत्तर –
व्हेंटीलेटर लावले म्हणजे रुग्ण आता परत येणार नाही असे काही समीकरण नाही. रुग्णाचा आजार काय आहे, तो किती जुना आहे तेही महत्वाचे असते. व्हेंटीलेटर ही सपोर्ट सिस्टीम आहे, ही सिस्टीम लावल्यावर रुग्णाच्या शरिराने प्रतिसाद दिल्यास नक्कीच रुग्ण बरा होवू शकतो, त्यामुळे व्हेंटीलेटर लागल्याचा गैरसमज न करता नेमकी आपल्या रुग्णाची स्थिती काय तेही समजण्याचा प्रयत्न नातेवाईकांना केला पाहिजे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here