गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात

0
41

जळगाव : गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगावमध्ये संविधान दिवसानिमित्त जनजागृती व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ’संविधान दिन’म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना संविधानाबाबत सखोल माहिती व्हावी हा या स्पर्धेमागील उद्देश होता.

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना समजून घेतली. कार्यक्रमाला प्रामुख्याने सामाजिक विज्ञान शिकवणार्‍या पौर्णिमा शिंपी, कविता पाटील, प्रतिभा बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.

संविधान दिवसानिमित्त स्कूलमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य मुलांना लोकशाही राज्यशास्त्र याबद्दल अवगत करणे, सामान्य ज्ञान प्राप्त होणे देशातील विविध घडामोडी बद्दल जागृत करणे तसेच देशातील वेगवेगळ्या राज्यातील राजकारणी व्यक्ति बद्दल माहिती विचारणे जेणेकरून मुलांच्या तल्लख बुद्धीला चालना मिळेल. या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन व सूत्रसंचालन शिक्षका मीनाक्षी नन्नवरे यांनी केले तर शिक्षक विजय पाटील यांनी पूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाला स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्यासह इतर सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here