जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या फिजीओथेरपी अंतिम वर्षाच्या परिक्षांचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचा निकालाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ यामध्ये फिजीओथेरपीच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली असून नुकताच निकाल जाहीर झाला. यात डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील साक्षी सुनिल पाटील हिने ७०.५ टक्के गुण संपादन करुन प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय समिक्षा मोहन भोंगाळे हिला ६८.८८ टक्के आणि तृतीय मुस्कान जयप्रकाश गुमनानी ६८.२५ टक्के गुण प्राप्त केले. याशिवाय अन्य प्रविष्ठ विद्यार्थ्यांनीही चांगले गुण प्राप्त करुन यशाची परंपरा कायम राखली.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डौ.वैभव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.