डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रिती महाजन भारत भूषण पुरस्काराने सन्मानित

0
91

जळगाव : येथील डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रिती महाजन यांना संविधान दिनानिमित्त भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांचे कडून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या आधी देखिल मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन पुरस्कार २०२३ भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन यांच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार २०२२ जागतिक महिला दिनी राजनंदीनी बहुद्देशिय संस्था,जळगांव, जिल्हा युवती पुरस्कार २०२१भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तुळजाई बहुद्देशिय संस्था मेहरुण, जळगांव अंतर्गत तृतीय जिल्हा युवती पुरस्कार मिळाले आहे. तसेच त्यांचे संशोधन पेपरही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये प्रसिध्द झाले असून कवियीत्री बहीणाबाई उत्‍तर महाराष्ट्र विद्यापिठातून त्या पीएचडी करत आहे.

अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांचे कडून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल भारत भूषण पुरस्काराने संगिता बियाणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुसावळचे आमदार संजय सावकारे साहेब जळगावचे आमदार राजू मामा भोळे अहिराणी गाणे पैशावाली ताई फेम असलेल्या विद्याताई भाटिया उद्योजक बियाणी, राजूभाऊ सूर्यवंशी माजी नगरसेवक जिल्हा अध्यक्ष आरपीआय,अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था जयश्रीताई इंगळे हे होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here