रावेर लोकसभा मतदारसंघात डॉ. केतकीताई पाटील यांचे गाव तेथे संपर्क अभियान

0
69

राजकीय वाटचालीकडे मतदारसंघाचे लक्ष ; मतदारसंघातील प्रश्‍नांचे अवलोकन

जळगाव – देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. केंद्रीय राजकारणात मोठे योगदान राहिलेल्या जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी रावेर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान धर्तीवर रावेर लोकसभा मतदारसंघात सुशिक्षीत अन् राजकीय बाळकडू मिळालेल्या गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांचे गाव तेथे संपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून डॉ. केतकीताई पाटील यांच्या राजकीय वाटचालीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा होत आहे ती रावेर लोकसभा मतदारसंघाची. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ गेल्या २० वर्षापासून भाजपाच्या ताब्यात आहेत. १९९८ चा काळ वगळता या मतदारसंघातून भाजपा व्यतीरिक्त इतर पक्षाच्या उमेदवारांना पराभव पहावा लागला आहे. सामाजिकदृष्ट्या लेवा आणि मराठा बहुल असलेल्या या मतदारसंघाची राजकीय गणिते आत्तापर्यंत एकहाती होती. मात्र आता रावेर मतदारसंघातील राजकीय परीस्थिती बदलली आहे.  नवीन ,तरूण, उच्च शिक्षित आणि स्वतः ची ओळख असलेल्या उमेदवारांविषयीची चर्चा या मतदारसंघात होऊ लागली आहे.

 समाजकारणाचा वसा घेत डॉ. केतकीताई पाटील यांनी गाव तेथे संपर्क  हे अभियानच सुरू केले आहे. या अभियानांतर्गत  स्वतः ची ओळख निर्माण करणे ,रावेर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार डॉ. केतकीताई पाटील यांच्यातर्फे केला जात आहे. एवढेच नव्हे तर या संपर्क अभियानाच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रश्‍नांचेही अवलोकन डॉ. केतकीताई पाटील ह्या करीत आहेत.

” मेरी माटी मेरा देश ” अभियानाची सुरुवात डॉ. केतकी पाटील यांनी जिल्ह्यात सर्व प्रथम करून अंमलबजावणी केली. मतदासंघात असलेल्या समस्या व त्यावरील उपाय योजना याची माहिती आणि मतदारसंघात नव्याने काय करता येईल? अशा पध्दतीचा विचार घेऊन डॉ. केतकी पाटील यांच्या या संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने समाजसेवेसोबतच डॉ. केतकीताई पाटील यांच्या राजकीय वाटचालीकडेही मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी डॉ. केतकीताई पाटील यांची एक तरूण आणि सुशिक्षीत उमेदवार म्हणून रावेर मतदारसंघासाठी जोरदार चर्चा होत आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here