राजीव गांधी नॅशनल इस्टीटयुट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट भारत सरकार नागपूर आणि गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम
जळगाव : राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान अंतर्गत बौध्दीक संपदा हक्क आणि पेटंट डिझाईन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था भारत सरकार नागपूर आणि गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालय आयोजित बौध्दीक संपदा हक्क आणि पेटंट डिझाइन या कार्यक्रमात पेटंट आणि डीझाईनचे सहायक नियंत्रक डॉ. भारत एम सुर्यवंशी हे प्रमुख वक्ते होते.
पुढे बोलतांना भारतातील बौद्धिक संपदा प्रक्रिया आणि कायदेशीर पैलूंवर प्रकाशझोत टाकतांना महत्व व उपयोग विषद करून बौध्दिक संपदा म्हणजे काय? बौध्दिक संपदा हक्काचे वेगवेगळे प्रकार- कॉपीराईट, ट्रेडमार्क, इंण्डस्ट्रीयल डिझाईन, जिओग्राफीकल इंडेक्स, पेटंट सोदाहरण सांगितले. त्या संदर्भात चौर्य कसे होऊ शकते? ते होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी म्हणजे आपली बौध्दिक संपदा नोंदणी करणे. पेटंट किंवा कॉपीराईट अर्थार्जनाच्या दृष्टीने कसे फायदेशीर ठरतात या बद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत क्लिष्ट वाटणारा विषय सोप्या पध्दतीने, स्लाईड्सचा वापर करत, प्रासादिक खेळकर शैलीत त्यांनी मांडला. संपुर्ण कार्यक्रम हा ऑनलाईन पध्दतीने त्या ठीकाणी पार पाडला गेला.
राष्ट्रीय पातळीवरील व सर्व आरोग्य विज्ञान, संशोधन महाविद्यालय इ. मधील ५०० च्या विदयार्थी व शिक्षक सहभागी झाले. प्रत्येक सहभागीस भारत सरकारकडून ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येवून या विषयावर जनजागृती करण्यात आली. येणाऱ्या काळात हा विषय अत्यंत मोलाचा व महत्वाचा आहे हा संदेश या कार्यक्रमातून समारोप प्रसंगी देण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा.विशाखा गणविर यांनी केले तर डॉ. प्रियदर्शनी मून यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. मून यांच्या मार्गदर्शनानुसार गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राध्यापक तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.