कॅप्टन राजेंद्र राजपूत यांनी दिला युवा वैद्यकिय तज्ञांना जीवनाचा मंत्र
जळगाव – सेवा करतांना समर्पणाचा भाव महत्वाचा असून आजच्या युवा वैद्यकिय तज्ञांना आर्मीकडे करीयर बनवावे असे प्रतिपादन कॅप्टन राजेंद्र राजपूत यांनी आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आर्मी डे निमीत्त कार्यक्रमात केले डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आर्मी डे निमीत्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डिन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक,डॉ. प्रशांत गुडडेती, सृष्टी माहुलकर, आर्या देशपांडे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रेरणादायी व्यक्तीमत्वासाठी सकाळी ५ वाजेपासून सुरूवात केल्यास एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. ताजेतवाने राहण्यासाठी केव्हाही सुप्रभात हा उच्चार करून स्वताला टवटवीत ठेवा. शेरोशायरीचा अंदाजात त्यांनी युवा वैद्यकिय तज्ञांनी आर्मीत करीयरच्या अनेक संधी आहेत. तसेच कुठल्याही व्यवसायात किंवा जिवनात समर्पण महत्वाचे असते. दरवर्षी १५ जानेवारीलाच आर्मी दिवस का साजरा केला जातो? असा प्रश्न पडला असेल. तर १५ जानेवारीला आर्मी डे साजरा करण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे १ एप्रिल १८९५ ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. मात्र, १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. आणि दुसर कारण म्हणजे याच दिवशी जनरल केएम करियप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तेव्हापासून १५ जानेवारीहा दिवस आर्मी डे म्हणून साजरा केला जातो.
जनरल सर फ्रान्सिस बुचर यांनी करियप्पा यांच्याकडे भारतीय सैन्याची कमान सोपवली होती. त्यानंतर लेफ्टिनेंट करियप्पा हे भारताचे पहिले सेना प्रमुख बनले होते. १९४७ च्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तान विरोधातील युद्धात लेफ्टनंट जनरल करियप्पा यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं होतं.अनेक प्रश्नांची उकल त्यांनी आपल्या संवादातून केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रचेता मुकुंद उत्कर्ष भोसले यांनी मानले यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि डॉक्टरांनी परीश्रम घेतले.