डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शरिररचना शास्त्र विभागाचा उपक्रम
जळगाव : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी असलेल्या जागतिक शरीर रचना शास्त्र दिनानिमित्त शरीररचना शास्त्र विभागाने पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ.शुभांगी घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मानवी शरिरातील विविध अवयव, हाडे याशिवाय आतड्यांची रचना आदिंचे चित्र रेखाटले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्याहस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी शरिररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ.अमृत महाजन, प्रा.डॉ.शुभांगी घुले, डॉ.जमीर अहमद, डॉ.पूनम, डॉ.रघुराज यांच्यासह टिचिंग-नॉन टिचिंग स्टाफ उपस्थीत होता.