जळगाव : अनुवांशिकतेमुळे कमी वयातच बायपोलर डिसऑर्डर हा विकार जडलेल्या बालकावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. दरम्यान बालकावर ईसीटी थेरपीही करण्यात आली, आपला मुलगा आज सुस्थितीत पाहून पालकांनी आभार मानले.
शालेय परीक्षा ऐन तोंडाशी असतांना आपल्या मुलाच्या वर्तनामध्ये बदल झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. मानसोपचार तज्ञांद्वारे उपचार घेतले मात्र एके दिवशी बालक खूपच आक्रमक झाला, मारहाण करायला लागला, त्याला कुणालाही आवरता येत नव्हते व नेहमीचेच डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात बालकाला दाखल केले. येथील मानसोपचार तज्ञांच्या टिमने बालकाची लक्षणे ओळखूनच लगेचच त्याला स्थिर करण्यासाठी औषधी, इंजेक्शन्स दिले.
बालकाच्या काही रक्त तपासण्यांनुसार मेंदूमध्ये न्यूरो केमिकल वाढल्यामुळे त्याला त्रास होवू लागला, शास्त्रीय भाषेत त्याला बायपोलर डिस्ऑर्डर असे संबोधले जाते. कुटूंबात आजाराची हिस्ट्री असल्याने पालकांनी वेळ वाया न घालवता लगेचच तज्ञांचा सल्ला घेतला. उपचारादरम्यान अनेकदा आम्ही देखील मार खाल्ल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु 1 महिन्याच्या उपचारानंतर आता बालक अगदी नॉर्मल असल्याने डॉक्टरांसह पालकांच्या जीवात जीव आला.
मानसोपचार तज्ञ डॉ.विलास चव्हाण सांगतात की, बायपोलर डिसॉर्डर हा मानसिक आजार आहे. यात व्यक्तीला स्वतःच्या मनावर ताबा ठेवताना त्रास होतो. परिणामी सतत मूड बदलत असतात. रुग्ण व्यक्ती काही वेळ खूप आनंदी असते, पुढे काही मिनिटांमध्येच ती व्यक्ती रडताना दिसते. मात्र या आजाराचे वेळीच लक्षण ओळखले तर तत्काळ होणार्या उपचारांमुळे व्यक्तीला लवकर दिलासा मिळतो, आजारावरली सर्व तपासण्या व उपचार येथे होत असून अनेक रुग्णांना त्याचा लाभ झाला.
हे करा
सकारात्मक विचार करणे. कोणत्याही गोष्टीचा अधिक ताण न घेणे. व्यसनांपासून लांब राहणे. नियमितपणे व्यायाम करणे. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे.
बायपोलर डिसॉर्डरची लक्षणे
- हायपरटेंशन होणे.
- निद्राचक्र पूर्ण न होणे.
- खूप जास्त वेळ बोलणे किंवा काहीच न बोलणे.
- हायपर अॅक्टिव्ह होणे किंवा अधिक प्रमाणामध्ये शारीरिक ऊर्जा खर्च होणे.
- कोणत्यातरी विचारामध्ये गुंग असणे.
- नेहमी अनिश्चित राहणे.
- निर्णय घेताना घाबरणे.
- वजन वाढणे किंवा वेगाने कमी होणे.
- भूक न लागणे, जेवणाच्या वेळा न पाळणे.
- विनाकारण चिडचिड होणे.
- अतिआत्मविश्वास वाढत जाणे. सतत आनंदी राहणे.
- सतत अस्वस्थ वाटणे
मानसिक आजारावरील मार्गदर्शनसाठी डॉ.आदित्य यांच्याशी
9404476111 संपर्क साधावा