डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डिसेक्शनपूर्वी घेतली शपथ

0
49

जळगाव : शरिरशास्त्र विभागांतर्गत प्रात्याक्षिक सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शपथ घेणे अनिवार्य असते. त्याकरीता बुधवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शपथविधी कार्यक्रम आयोजित केला जातो.

याही वर्षी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या २०० विद्यार्थ्यांनी डिसेक्शन अर्थात प्रात्याक्षिक सुरु करण्यापूर्वी मला अभ्यासासाठी मिळालेल्या मानवी शरीराची हेळसांड होवू देणार नाही तसेच या शरीराचा उपयोग हा अभ्यासासाठी करेल अशी शपथ घेतली. ही शपथ शरिरशास्त्र विभागप्रमुख डॉ.अमृत महाजन, डॉ. शुभांगी घुले यांनी विद्यार्थ्यांना दिली असून त्याचे महत्व समजावून सांगितले.

समाजातील मरणोत्‍तर देहदान केलेल्यांमुळे भावी डॉक्टर घडत असतो, त्यामुळे या विभागातील बॉडी हाताळतांना काळजी घ्यावी, त्यातूनच तुम्ही घडणार आहात, त्याची हेळसांड व्हायला नको, असे देखील यावेळी डॉ.महाजन यांनी सांगितले. याप्रसंगी शरिरशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, डॉक्टर्स उपस्थीत होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here