डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हाडाचा ट्युमर असलेल्या १२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियाअस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांच्या टीमचे उल्लेखनीय यश

शहरातील नामांकित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हाडाच्या ट्युमरने पीडित १२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक अग्रवाल व त्यांच्या कुशल वैद्यकीय पथकाने केली. ग्रामीण भागातून आलेल्या अनेक रुग्णांना वेळीच निदान व उपचार मिळाल्यामुळे नवजीवन लाभले आहे. डॉ. अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केवळ शस्त्रक्रिया नव्हे तर उपचारापूर्वी तपासणी, निदान, शस्त्रक्रियेनंतरचा पुनर्वसन कार्यक्रमही अत्यंत नियोजनबद्ध रीतीने राबवला. या यशाबद्दल बोलताना डॉ. दीपक अग्रवाल म्हणाले, ग्रामीण आणि दूरदूरच्या भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या टीमने मेहनतीने काम केल्यामुळे आज १२ रुग्ण पुन्हा चालू लागले, याचा आम्हाला आनंद आहे. हाडांचे ट्युमर असलेल्या रुग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालय हे नवसंजीवनी ठरत आहे.
असे आहेत शस्त्रक्रिया झालेले रूग्ण १) शेगाव येथील शिवानी ठाकरे या १८ वर्षीय तरूणीला राइट डिस्टल फिमर जायंट सेल ट्यूमर या आजाराचे निदान करण्यात आले. या तरूणीवर एक्स्टॅन्डेड क्युरेटाज अॅण्ड बोन ग्राफ्टींगची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.२) जळगाव येथील दर्शिल भारंबे या १८ वर्षीय तरूणाला राइट डिस्टल फिमर लॅटरल ऑस्टिओकॉन्ड्रोमा या आजाराचे निदान करण्यात आले. त्याच्यावर एन ब्लॉक रिसेक्शनची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.३) खामगाव येथील २६ वर्षीय अमोल सोलंके या रूग्णास राइट डिस्टल अल्ना एन्युरसिमल बोन सिस्टचे निदान करण्यात आले. त्याच्यावर सौव कपांजी प्रक्रिया ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.४) जळगाव येथील २५ वर्षीय भारत बारेला याला लेफ्ट प्रॉक्सिमल अल्ना ऑस्टिओइड ऑस्टियोमा या आजाराचे निदान करण्यात आले. त्याच्यावर एन ब्लॉक रिसेक्शन ही शस्त्रक्रिया करण्यात आली.५) यावल येथील १८ वर्षींय कमलेश पाटील या रूग्णाला लेफ्ट प्रॉक्सिमल टिबिया ऑस्टिओइड ऑस्टियोमा या आजाराचे निदान करण्यात आले. त्याच्यावर एन ब्लॉक रिसेक्शन ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.६) भुसावळ येथील १७ वर्षीय कुणाल जाधव याला लेफ्ट ह्युमरस हेड कोंड्रोब्लास्टोमा आजाराचे निदान करण्यात आले. त्याच्यावर एक्सीजन बायोप्सी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.७) मुंबई येथील ४० वर्षीय शांताराम बाविस्कर यांना राइट डिस्टल फिमर जायंट सेल ट्युमर या आजाराचे निदान करण्यात आले. त्यांच्यावर क्युरेटाज अॅण्ड बोन ग्राफ्टिंगची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.८) जळगाव येथील ३७ वर्षीय शरद सोनवणे यांना राइट डिस्टल फिमर ऑस्टिओसारकोमा या आजाराचे निदान करण्यात आले. त्यांच्यावर ट्यूमर रिसेक्शन आणि टोटल क्नी आर्थ्रोप्लास्टी विथ मेगा-प्रोस्थेसिस ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.९) २२ वर्षीय भूषण तायडे यास राइट डिस्टल रेडियस जायंट सेल ट्यूमर या आजाराचे निदान करण्यात आले. त्याच्यावर क्युरेटाज अॅण्ड बोन ग्राफ्टींगची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.१०) भुसावळ येथील २२ वर्षीय लोकेश वारके या रूग्णास राइट प्रॉक्झीमल टिबीया ऑस्टीओमायलाइटीस( गॅरिज सक्लेरोझिंग ऑस्टीओमायलाइटीस) या आजार असल्याचे निदान करण्यात आले. त्याच्यावर क्युरेटाज ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.११) ३६ वर्षीय सुरेन्द्र सावळे यांना राइट थंब एन्कोन्ड्रोमा प्रॉक्सिमल फॅलिंक्स हा आजार झाल्याचे निदान करण्यात आले. त्याच्यावर क्युरेटाज ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.१२) भुसावळ येथील २५ वर्षीय प्रफुल पाटील या तरूणाला फायब्रस डिस्प्लेसिया विथ पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स ऑफ लेफ्ट अल्ना अॅण्ड लेफ्ट ह्युमरस या आजाराचे निदान करण्यात आले. त्याच्यावर ओपन रिडक्शन विथ इंटरनल फिक्सेशन ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
हाडांच्या गाठी दुर्मिळ असल्या तरी त्या दुर्लक्षित केल्यास जिवघेण्या ठरू शकतात.अंगाचे कार्य टिकवून ठेवण्यात आणि जगण्याचा दर सुधारण्यात लवकर निदान महत्वाची भुमिका बजावते असे त्यांनी जोर देवून सांगितले. कोणतीही सततची सूज किंवा अस्पष्ट हाडांच्या वेदना दुर्लक्षित करू नये. त्वरीत अस्थीरोग तज्ञांची मदत घ्या सौम्य आणि घातक हाडांच्या जखमांचा लवकर शोध घेण्यासाठी जागरूकता आणि वेळेवर इमेजिंग करणे महत्वाचे आहे.अस्थीरोग विभाग जनतेला जागरूकता पसरवण्याचे आणि हाडांच्या आरोग्याला प्राध्यान्य देण्याचे आवाहन करतो. डॉ. दिपक अग्रवाल अस्थीरोग विभाग प्रमुख.