जळगाव : मुलांचा उत्साह, सतत शिकायची आणि जग शोधायची जिदद मनात असेल तर यश सहज साध्य होते यशस्वी जिवनाचे हे तिन मुलमंत्र जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी आज गोदावरी अभियांत्रिकीत अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना अभियंता दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच उत्कृष्ट अभियंता होण्यासाठी कोणते गुण आत्मसात करायला पाहिजे विद्यार्थ्यांना तीन मूलमंत्र त्यांनी दिले, ते म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचे ध्येय निश्चित करून त्याचे नियोजन व साध्यता त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेत असताना त्यांचा अभियंता होण्याचा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितला.
जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व शाखा या तेवढ्याच महत्त्वाच्या असतात व त्या माध्यमातून देशाची जडणघडण होत असते. सर्वच शाखा या परस्परावलंबी असतात त्यामुळे त्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी त्या शाखेमध्ये शिकत असताना एक्सपर्टीज होणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांनी इनोवेशन वर लक्ष देऊन देशाच्या जडणघडीमध्ये सहभागी होणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. समाजामध्ये लक्ष देताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्यासमोर असतात त्याचं सोल्युशन इंजिनियर देऊ शकतो. अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करणे गरजेचे आहे.तसेच त्यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रसिद्ध अभियंते भारतरत्न श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस अभियंता दिन याच अनुषंगाने गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्टुडन्ट कौन्सिलच्या माध्यमातून अभियंता दिन साजरा करण्यात आला. त्यादिनानिमित्त महाविद्यालयात विभाग निहाय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्ष विभागामार्फत पोस्टर कॉम्पिटिशन,संगणक विभागामार्फत (कौन बनेगा कॉम्प्युटर इंजिनियर), यंत्र विभागामार्फत डिबेट कॉम्पिटिशन, विद्युत विभागामार्फत पीपीटी प्रेझेंटेशन स्पर्धा, इ अँड टीसी विभागामार्फत क्विझ कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनचे डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (कोऑर्डिनेटर पॉलीटेक्निक), तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन तसेच श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अभियंता दिनाच्या निमित्ताने सिमरन कोळी, केतकी टिकले व वजीहा सय्यद, प्राची राजपूत या विद्यार्थिनींनी आपली मते मांडली.त्यानंतर गोदावरी फाउंडेशन चे डॉ. वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंजिनियर्स चे महत्व समजावून सांगितले. व कोणतेही कार्य करण्यासाठी इंजिनिअरची आवश्यकता भासत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी एक चांगला इंजिनियर म्हणून आपण नावारूपाला यावे असे सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तसेच सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणीका पाटील, दिपाली खोडके विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्टुडन्ट कौन्सिल तसेच प्रा. आर व्ही. पाटील, प्रा. निलेश चौधरी, प्रा. ललिता पाटील, प्रा. हेमंत नेहेते, प्रा. अमित म्हस्कर, यांनी मेहनत घेतली. त्यांना प्रा. हेमंत इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.