डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातक्लिनिकल रिसर्चमधील गुड क्लीनिकल प्रॅक्टिस (जीसीपी)

चांगल्या वैद्यकीय पद्धतीचे मूलतत्त्व विषयकावर चर्चा कार्यशाळा उत्साहात
जळगाव: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव, यांच्या आयईसी विभागाने क्लिनिकल रिसर्चमधील गुड क्लिनिकल प्रॅक्टिस (जीसीपी) या विषयावर एक दिवसाची सतत वैद्यकीय शिक्षण सीएमई (सीएमइ) कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेत तज्ञांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉ. अक्षता पाटील हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली. वैद्यकीय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर आणि अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. के.के. महाजन (भूलरोग तज्ञ), डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. सी.डी. सारंग (फिजिशियन), डॉ. शिवाजी सादुलवाड (शल्य चिकित्सक), डॉ. अनंत बेंडाळे (बालरोग तज्ञ), डॉ. सुयोग चोपडे, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. रंजना शिंगणे आणि डॉ. बापूराव बिटे यांच्यासारखे मान्यवर उपस्थित होते.या कार्यशाळेत एकूण ८ सत्रे झाली. यामध्ये चांगल्या क्लिनिकल प्रॅक्टिसचा परिचय (डॉ. प्रशांत सोळंके आणि डॉ. देवेंद्र आर. चौधरी), क्लिनिकल संशोधनातील नीतिमत्ता आणि जबाबदार्या (डॉ. निलेश बेंडाळे), प्रस्ताव, आवश्यक दस्तऐवज आणि चाचणी व्यवस्थापन (डॉ. धीरज चौधरी आणि डॉ. बापूराव बिटे), क्लिनिकल चाचण्यांमध्ये देखरेख आणि गुणवत्ता हमी (डॉ. प्रशांत सोळंके आणि डॉ. अनंत बेंडाळे), आणि प्रतिकूल घटना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज उभाड व अमन यांनी केले आणि आभार डॉ विदिशा व डॉ ललिता यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. त्यानंतर, सहभागींना प्रमाणपत्रे वाटण्यात आली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, प्राध्यापक , पदवीत्तर विद्यार्थी, डॉ साक्षी,डॉ सोनाली,शिवराज दाभाडे ( जनरल सेक्रेटरी) आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

