गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात जागतिक स्ननपान दिनानिमित्त जनजागृतीपोस्टर स्पर्धा, प्रश्न मंजूषा, प्राथमिक उपचार केंद्रात मार्गदर्शन

जळगाव – येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताहा निमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. १ ऑगस्ट रोजी नर्सिंग महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागप्रमुख प्रा. मिनाओ देवी, असो.प्रा. निम्मी वर्गीस, सहाय्यक प्रा. जयश्री जाधव, स्नेहल जांभूळकर यांच्या हस्ते थीम ओपनिंग करण्यात आले. २ ऑगस्ट रोजी बी.एसस्सी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून रूग्णालयात आरोग्यविषयक संवाद साधण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रा. जयश्री जाधव, स्नेहल जांभूळकर उपस्थित होते. ४ ऑगस्ट रोजी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सहाय्यक प्रा. जयश्री जाधव, कॉलेट लोंढे, प्राजक्त सावरकर उपस्थित होते. ५ ऑगस्ट रोजी स्तनपान या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. दि. ६ रोजी नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बी.एसस्सी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. ७ ऑगस्ट रोजी स्तनपान या विषयावर निवासी डॉ. तेजस सोनवणे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक
पोस्टर स्पर्धेत बी.एसस्सी तृतीय वर्ष आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत गृप बी विजेते ठरले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.

gaayog