ताज्या बातम्या

डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल — डॉ.उल्हास पाटील


गोदावरी अभियांत्रिकीत वाढदिवसानिमीत्त शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव — सामाजिक, राजकीय आणि विविध क्षैत्रात डॉ. केतकी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असून नाविण्यपुर्ण संकल्पनातून या देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती विविध उपक्रमातून ते जनतेला करून देत आहेत.त्यांच्या कार्याची देश दखल घेईल असा विश्वास माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांनी आज बोलून दाखवला.
गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी फाउंडेशन परिवाराने हा सोहळा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. केतकी पाटील यांचे स्वागत पुष्पगुच्छ, औक्षण व अभिवादनाने करण्यात आले. यानंतर त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा परिचय चित्रफित व्दारे सादर करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. विजयकुमार पाटील प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. प्रशांत वारके प्राचार्य, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च,सौ. निलिमा चौधरी प्राचार्य, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, डॉ. निलिमा वारके प्राचार्य, डॉ. वर्षा पाटील महिला कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन प्रा. दीपक झांबरे समन्वयक, गोदावरी तंत्रनिकेतन,डॉ. कविता देशमुख प्राचार्य, डॉ. वर्षा पाटील महिला कॉलेज ऑफ होम सायन्स,डॉ. नयना झोपे प्राचार्य, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी चेतना सोनवणे द्वितीय वर्ष संगणक शाखा, गोदावरी तंत्रनिकेतन हिने एक भावस्पर्शी गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सर्व प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून गोदावरी फाउंडेशनच्या कार्यपद्धतीचे आणि डॉ. केतकी पाटील यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत, त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करताना सांगितले की, गोदावरी फाउंडेशन हे केवळ एक शैक्षणिक संस्थांचे समूह नसून, समाज घडवण्याचे एक माध्यम आहे. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या आमच्या मूलभूत मूल्यांमध्ये सर्वांचा सहभाग अनिवार्य आहे. सुत्रसंचालन खुशाली बेलदार यांनी केले तर समन्वयक प्रा. हेमराज धांडे आणि प्रा. नकुल गाडगे (ग्रंथपाल)यांच्या मार्गदर्शना नुसार प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button