आजचा दिवस गोदावरी परिवारासाठी आणि जळगाव जिल्ह्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे — कारण आज आपल्या सर्वांच्या लाडक्या, गुणी, करारी आणि हृदयाने अतिशय मोठ्या डॉ. केतकी ताई पाटील यांचा वाढदिवस आहे.

डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांची जेष्ठ आणि लाडकी कन्या म्हणून जन्मलेल्या केतकी ताईंना त्यांच्या पालकांचा दूरदृष्टीचा वारसा, सेवाभावाची परंपरा आणि नेतृत्वाची जाणीव लाभली आहे. MD Radiology या उच्चशिक्षणासोबतच त्यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर समाजसेवा, नेतृत्व आणि जनतेशी नातं जोडण्यातही वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
ज्या काळात तरुण पिढी मोठ्या शहरात स्थायिक होण्याची स्वप्ने पाहते, त्या वेळी ही ‘सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेली’ कन्या आणि त्यांचे पती डॉ. वैभव पाटील, DM Cardiologist यांनी मोठ्या संधी आणि सुखसोयी बाजूला ठेवून जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची सेवाकरण्याचा संकल्प केला. कोविडच्या अभूतपूर्व संकटकाळात, जेव्हा लोक एकमेकांना भेटायलाही घाबरत होते, त्या वेळी या दांपत्याने असंख्य रुग्णांना जीवदान देण्यासाठी दिवस-रात्र झटत उपचार केले. हा त्यांचा सेवाभाव इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
केवळ वैद्यकीय सेवेतच नाही, तर गावागावातून फिरून, शेकडो खेड्यांमध्ये जाऊन, गरीब, आदिवासी व वंचित समाजातील महिलांचे, पुरुषांचे दुःख जाणून घेणे आणि त्यांच्या समस्या प्रत्यक्ष सोडविण्याचा प्रयत्न करणे — हे तिच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.
मागील दोन वर्षांपासून भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम नेतृत्व कौशल्य दाखवत पक्ष संघटन मजबूत केले आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक प्रवृत्तीमुळे त्या सर्व साधुसंतांच्या लाडक्या झाल्या आहेत आणि त्यांचे आशीर्वाद त्यांना लाभत आहेत.
केतकी ताईंचा निरहंकारी, समजूतदार आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव, त्यांच्यातील सहानुभूती आणि करारी निर्णयक्षमता — हे गुण त्यांना खऱ्या अर्थाने पुढील पिढीच्या नेतृत्वासाठी सक्षम बनवतात.
अशी ही बापासारखी समर्थ, संवेदनशील, करारी आणि प्रेरणादायी मुलगी, ही केवळ गोदावरी परिवाराचीच नाही, तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याची अभिमानाची ठेवा आहे. त्यांच्या आगामी सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी मी — प्रमोद भिरुड, मनःपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांचा हा सेवायज्ञ असाच अखंड पेटत राहो, आणि त्यांचे कार्य आणखी व्यापक होवो.
🌸 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, केतकी ताई! 🌸



Nice post! 1754807345