ताज्या बातम्या

मोफत आयुर्वेद आरोग्य शिबिरात २४७ नागरिकांना लाभ


बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी नवसंजीवनी

कुर्‍हे – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि स्वराज्य जननी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरात संधिवात, आमवात, मधुमेह, हृदयविकार, आम्लपित्त, स्थूलपणा आणि त्वचेचे विकार यावर आयुर्वेद पद्धतीने तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. २४७ रुग्णांनी मोफत तपासणी व उपचारांचा लाभ घेतला, यात २० लहान मुलांचा समावेश होता. यावेळी डॉ. साजिया खान, डॉ. पालवे चौधरी, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. शबिना गवळी, मोहित येवले, गौरव चौधरी आदी तज्ञांनी तपासणी केली. शिबिराच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे महत्व आणि प्रभावी परिणाम विषद करण्यात आले. बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी हा उपक्रम लाभदायी ठरल्याचे समाधान व्यक्त केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण, सदस्य बापू आठवले तसेच संस्थेचे इतर कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कळसकर सो, उपाध्यक्ष रवींद्र गांधीले, जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, सरपंच सौ. दुर्गाताई शिंदे आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील आणि अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले यांच्या मार्गदर्शनानुसार शिबिराचे आयोजन करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button