मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तेमसर्वसामान्यांसाठी योजनाफ पुस्तकाचे प्रकाशन

भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील यांच्या संकल्पनेतून पुस्तकाची निर्मिती मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीप्रसंगी पुस्तकाचे प्रकाशन
जळगाव – भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या ’सरकारच्या सर्वसामान्यांसाठी योजना ’ पुस्तिकेचे १२ ऑगस्ट रोजी मुंबई येथे सह्याद्री शासकीय विश्राम गृह येथे आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा(विदर्भ तापी व कोकण खोरे) विकास मंडळ मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन, पर्यटन, खनिज कर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. शंभुराजे देसाई, पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री ना. जयकुमार गोरे, उद्योग मंत्री ना.उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे आदीच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, आ. राजुमामा भोळे, आ. चैनसुख संचेती, आ.अमोल जावळे यांनी ही प्रकाशन करून कौतुक केले. आरोग्य दूत तथा मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी पुस्तिके बद्दल अभिनंदन केले.
शासनाने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना आणलेले आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या व त्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी यातील ठळक योजनांची माहिती असलेली पुस्तिका डॉ. केतकी ताई पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. केतकीताई यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
उपक्रमांचे कौतुक
गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी समाजकारण करताना अनेक उपक्रम राबविले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील प्रत्येक दिवसाचे महत्व विषद करणारी दिनदर्शिका, संविधान निर्मितीबाबतचा घटनाक्रम दर्शविणारी दिनदर्शिका तयार करुन खान्देशातील प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आता राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना नेमक्या काय आहेत? त्याचा लाभ कसा मिळेल, याबाबतची इत्यंभूत माहिती दर्शविणारी ही पुस्तिका समाजातील सर्वच नागरीकांसाठी तयार करुन ती पोहोचविण्याचे कार्य डॉ. केतकीताई पाटील