गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अँटी-रॅगिंग डे – ‘सर्वांसाठी सन्मान, रॅगिंगला पूर्णविरामफ

जळगाव — या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे अँटी-रॅगिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्राचार्या प्रा. विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कॅम्पस सुरक्षित व सर्वसमावेशक ठेवण्याचे महत्त्व विषद करत रॅगिंग हा कायद्याखाली दंडनीय गुन्हा आहे आणि संस्थेत यासाठी कठोर उपाययोजना राबवल्या जातात, ज्यामध्ये अँटी-रॅगिंग समित्या, हेल्पलाईन्स व गोपनीय तक्रार नोंदणी प्रणालीचा समावेश आहे. यावेळी डॉ. ललिता सापकळे, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज, यांंनी अँटी-रॅगिंग कायदे व धोरणे यावर सविस्तर माहिती दिली, विद्यार्थ्यांना रॅगिंगविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे तसेच पीडितांना मदत करण्याचे आवाहन केले.या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी कॅम्पस रॅगिंगमुक्त ठेवण्याची शपथ घेतली.

