ताज्या बातम्या
वाचन संस्कृतीला चालना देणारा ‘लायब्ररी यूजर अवॉर्ड

जळगाव, – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट कमिटीतर्फे लायब्ररी यूजर अवॉर्ड सोहळा डॉ. अक्षता पाटील कॉन्फरन्स हॉल येथे पार पडला.
या कार्यक्रमाचा उद्देश वाचनाची सवय जोपासणार्या आणि ग्रंथालयातील संसाधनांचा उत्कृष्ट वापर करणार्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणा देणे तसेच लायब्ररीला सर्वाधिक भेटी देणारे, सर्वाधिक पुस्तक ाचा उपयोग करणे, ग्रंथालयातील साधनांचा सर्वोत्कृष्ट वापर करणारे अशा विविध श्रेणींमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .प्राचार्या प्रा. विशाखा गणवीर , उपप्राचार्य जसनीत दया यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. उपस्थित सर्वांनी ग्रंथालयातील विविध संग्रह व सुविधा अधिकाधिक वापरण्याचा संकल्प केला


