ताज्या बातम्या
राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

जळगाव — डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स तसेच डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला .ग्रंथपाल दिनानिमित्त राहुल निकम पिक्सल वर्ल्ड इन्स्टीटयुटचे संस्थापक यांनी डीजिटल डिझाईन अँन्ड लिगल थ्रेड फोटोशॉप रोल इन फॅशन अँन्ड आयपी यावर प्रेझेंटेशन केले. तसेच फोटोशॉप मध्ये महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. डॉ. नयना झोपे यांनी विद्यार्थिनींना रंगनाथन यांच्या विषयी थोडक्यात माहिती दिली .ग्रंथपाल सौ कविता राहुल भोरटके यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच ग्रंथपाल डॉ. ईश्वर राणे सर यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
