ताज्या बातम्या
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा

जळगाव – डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके यांनी एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश सरोदे यांनी राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस १३१ वी जयंती साजरी करत असताना आपल्या भाषणात एस. आर. रंगनाथन यांचा जीवनपट समोर मांडला त्यात त्यांनी त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १८९२ मद्रास या गावी झाला, त्यांनी गणित विभागात एम.ए केले नंतर १९२४ मध्ये ते मद्रास विश्वविद्यालय येथे ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. एस. आर. रंगनाथन यांचा १२ ऑगस्ट हा जन्मदिवस लायब्ररी डे म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमास महाविद्यालयातील सगळे सहकारी उपस्थित होते.
ljhtwv