ते दहा दिवस या पर्यावरणपूरक चित्रपटातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

पर्यावरण पुरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा ते १० दिवस चित्रपट भुसावळातील विद्यार्थ्यांमध्ये
भुसावळ — डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ या विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना ’गणपती बाप्पा मोरया’, ’मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा सामाजिक मराठी चित्रपट ते दहा दिवस दाखविण्यात येवून जनजागृती करण्यात आली.
राघव फिल्म प्रॉडक्शन आणि बंधन प्रॉडक्शन यांच्यातर्फे निर्मित या चित्रपटात महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे, परंतु पहिल्यांदाच त्यामुळे होणारे जलप्रदूषण व त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम यातून प्रकाशझोतात आणण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये ’मन की बात’ या कार्यक्रमात गणेशोत्सव, मातीच्या मूर्ती आणि जलप्रदूषण टाळण्याबाबत दिलेल्या संदेशावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक भारत वाळके दिग्दर्शित आहेत. यात पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व यांसारखे महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलेले आहे. समाजाला व शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागृत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात यावा ही प्रेरणा दिली.