गोदावरी कृषी संकुल जळगाव परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन

गणपती बाप्पांचं आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत असतात. डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालय येथे दि. *27 ऑगस्ट 2025 रोजी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात व सांस्कृतिक उत्सवात महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गणपती बाप्पा चे वाजत गाजत स्वागत केले.
याप्रसंगी डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. शैलेश तायडे त्यांच्यासोबत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी / विद्यार्थिनी उपस्थित होते.
गणपती मूर्ती ची विधिवत प्राणप्रतिष्ठा व पूजा सन्मानीय प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेश मूर्ती स्थापन करतेवेळी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. महाविद्यालयामध्ये हा गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे देखील आयोजन केलेले आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये द्वितीय , तृतीय व चतुर्थ वर्षाच्या* विद्यार्थ्यांचा / विद्यार्थिनींचा समावेश आहे. तसेच त्यांच्या सोबतीने महाविद्यालयाचे सर्वच विद्यार्थी या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणार आहेत. मा. प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे. तसेच त्यांना महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभत आहे.
तरी सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना / विद्यार्थिनींना विनम्र आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी /विद्यार्थिनींनी उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करून गणपती उत्सवाचे महत्त्व अधिक सक्षम करावे
गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.